मौजमजा करण्यासाठी १० वीतला मुलगा जेव्हा गाड्या चोरतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:28 IST2018-08-22T18:27:34+5:302018-08-22T18:28:02+5:30
आधुनिकतेकडे जाताना मूल्यांचा विसर पडला असल्याची चर्चा अनेकदा सुरु असते. याच शब्दांचा प्रत्यय पुण्यात आला असून अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरत असल्याचे समोर आले आहे.

मौजमजा करण्यासाठी १० वीतला मुलगा जेव्हा गाड्या चोरतो
पुणे : आधुनिकतेकडे जाताना मूल्यांचा विसर पडला असल्याची चर्चा अनेकदा सुरु असते. याच शब्दांचा प्रत्यय पुण्यात आला असून अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, शहरातील नवभारत शाळा, कोंढवे येथे एक मुलगा मोटार सायकल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर सापळा लावून त्या मुलाला पकडण्यात आले. अधिक माहिती घेतली असता त्याने ही मोटारसायकल आशीर्वाद गार्डन सोसायटीमधून चोरल्याचे कबूल केले.मात्र त्याने ही चोरी मौजमजा करण्यासाठी सांगितल्यावर पोलिसही चक्रावले. हा मुलगा कोंढवे धावडे येथील शाळेत दहावीत शिकत आहे. पोलिसांनी आशीर्वाद सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता याच मुलाने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या या मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.