भीतीपोटी १४ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:29 IST2019-02-25T19:27:43+5:302019-02-25T19:29:14+5:30
याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भीतीपोटी १४ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या
मुंबई - आज शहरात एका मागोमाग एका आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने मित्राची आई शाळेतील प्रिन्सिपल आणि पालकांजवळ तक्रार करणार असल्याचे कळाल्यानंतर भितीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजीपार्क येथे एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. 14 वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत खटके उडत होते. दोघांचे पटत नव्हते. यावरून दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आईने त्याला शाळेचे प्रिन्सिपल आणि त्याच्या आईकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. या भितीने त्याने शुक्रवारी सायंकाळी रहात असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.