तळघरात 13 टन सोनं, अब्जावधींची रोकड... भ्रष्टाचाराचा 'चायनीज पॅटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:22 IST2019-10-03T21:19:54+5:302019-10-03T21:22:51+5:30
तळघरातून काय मिळाले ते पाहून चिनी सरकारचे डोळे पांढरे झाले.

तळघरात 13 टन सोनं, अब्जावधींची रोकड... भ्रष्टाचाराचा 'चायनीज पॅटर्न'
चीन - जर एखाद्या अधिकाऱ्याच्या घरातून 2 लाख कोटीची रोख रक्कम आणि 13 टन सोनं सापडलं तर त्या देशाच्या सरकारलाही नक्कीच धक्का बसेल. चीनमध्येही असेच काहीसे घडलं आहे. माजी अधिकारी झांग यांच्या घरी छापा टाकला गेला, तेव्हा तळघरातून काय मिळाले ते पाहून चिनी सरकारचे डोळे पांढरे झाले.
झांगचा हायकू शहराचा माजी महापौर होते. या छाप्यादरम्यान त्याच्या घरातून 13 टन सोने आणि दोन लाख 62 हजार कोटी रोकड सापडली. या सोन्याची किंमत 26 अब्जांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. एवढी मोठी मालमत्ता उघडकीस आणल्यानंतर या माजी अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक गुन्हे दाखल केला जाणार आहे. जर अधिकाऱ्याचा दोष सिद्ध झाल्यास त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. राष्ट्रीय पर्यवेक्षी आयोग त्या अधिकाऱ्याची चौकशी करत आहेत. त्याच्या तळघरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून तळघरात सोन्याच्या विटांच्या मोठ्या ढिगाने म्हणजे सोन्याच्या पट्ट्या भरल्या असल्याचे दिसून आले. २०१२ पासून चीनचे विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून आतापर्यंत १०,००० लोकांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. यापैकी 120 लोक महत्वाचे पदावर बसले आहेत. यातील काही लष्करी अधिकारी देखील सहभागी होते.