12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन चुलत भावांचा बलात्कार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 07:28 IST2020-10-10T07:26:14+5:302020-10-10T07:28:01+5:30

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पीडित मुलीचे वडिल शेतमजूर असून ते कामावर गेल्यानंतर मुलीच्या एका चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला.

A 12-year-old girl was raped by three cousins in Gujarat | 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन चुलत भावांचा बलात्कार, गुन्हा दाखल

12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन चुलत भावांचा बलात्कार, गुन्हा दाखल

नवी दिल्ली - गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या चुलत भावांनीच गेल्या पाच महिन्यांपासून हे दुष्कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी 4 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. 

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पीडित मुलीचे वडिल शेतमजूर असून ते कामावर गेल्यानंतर मुलीच्या एका चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, याबाबत आपल्या इतर दोन भावांनाही त्याने सांगितले. या दोन्ही भावांनी आईला न सांगण्याची धमकी देत पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केल्याचे माहिती नवसारीचे पोलीस उपअधीक्षक बीएस बोरी यांनी दिली. 

सर्वच आरोपी 18 वर्षांपेक्षा कमी

पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी 18 वर्षांपेक्षा लहान असून मुलीचे चुलत भाऊच आहेत. पीडित मुलीच्या पोटात दु:खत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता, ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले आहे. बुधवारी रात्री पुढील उपचारासाठी पीडितेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंद केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून POCSO कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. 
 

Web Title: A 12-year-old girl was raped by three cousins in Gujarat