१२ दिवसांत १२ कोटींचे सोने विमानतळावर जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:30 AM2024-02-13T05:30:37+5:302024-02-13T05:31:05+5:30

त्यापूर्वी ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान एकूण ७ किलो ८८ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून त्याची किंमत ४ कोटी २९ लाख रुपये इतकी होती. 

12 crore gold seized at airport in 12 days; Action by the Customs Department | १२ दिवसांत १२ कोटींचे सोने विमानतळावर जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

१२ दिवसांत १२ कोटींचे सोने विमानतळावर जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई - फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तब्बल १२ कोटी रुपयांच्या सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यापैकी गेल्या चार दिवसांत ५ कोटी रुपयांचे सोने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, पाच स्वतंत्र घटनांत अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यानुसार, ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान विमानतळावर १ किलो ७६ ग्रॅम सोन्याची तस्करी पकडण्यात आली आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९७ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणांत परदेशी व भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्यापूर्वी ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान एकूण ७ किलो ८८ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून त्याची किंमत ४ कोटी २९ लाख रुपये इतकी होती. 

सफाई कर्मचारीही चोरीत सहभागी
धक्कादायक गोष्ट म्हणजे, या तस्करीमध्ये विमानतळावरील काही सफाई कर्मचारीदेखील सहभागी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. ६ व ७ फेब्रुवारी रोजी ६ किलो ३३ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून त्याची किंमत ३ कोटी ४९ लाख रुपये इतकी होती.  ३, ४, ५ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे ४ किलो १३ ग्रॅम व २ किलो ४८ ग्रॅम सोने तस्करी पकडण्यात आली असून त्याची एकत्रित किंमत ३ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे.

Web Title: 12 crore gold seized at airport in 12 days; Action by the Customs Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.