११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:37 IST2025-09-07T13:36:25+5:302025-09-07T13:37:55+5:30
११ वर्षांची गर्भवती असल्याचे कळले आणि सगळ्यांना धक्काच बसला. या पीडितेने जन्म देताच बाळाचा मृत्यू झाला. मुलीवर ४५ वर्षीय शेजाऱ्याने बलात्कार केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
Crime News: ११ वर्षाची मुलगी. तिच्या पोटात दुखायला लागलं. तिने आईवडिलांना सांगितलं. तिला घेऊन पालक रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सगळ्यांना धक्काच बसला. कारण मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत आढळून आलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसुती केली, पण काही क्षणातच बाळाचा मृत्यू झाला. नंतर जेव्हा मुलीला व्यवस्थित विचारण्यात आलं, तेव्हा तिने शेजाऱ्याने केलेल्या कृत्याबद्दल सांगितलं.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावात ही घटना घडली आहे. गावातील दोन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीनेच ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला.
चॉकलेट खायला घेऊन जायचा आणि...
जेव्हा मुलीने घडलेली घटना सांगितली, तेव्हा कुटुंबीयांच्या सगळा प्रकार लक्षात आला. कुटुंबीयांनी सांगितलं की, ४५ वर्षीय व्यक्ती मुलीला चॉकलेट खाऊ घालण्याच्या बहाण्याने घेऊ जायचा. पण, तो तिला घरी घेऊन जायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. आरोपीने तिला धमकी दिली आणि व्हिडीओही बनवले होते.
आठ महिन्यांपासून करत होता अत्याचार
आरोपीने मुलीला इतकी भीती दाखवली की, तिची घरी काही सांगण्याची हिंमतच झाली नाही. जोपर्यंत तब्येत बिघडत नाही. तोपर्यंत तिने काहीच सांगितले नाही. पण, पोट दुखायला लागले आणि हा सगळा प्रकार समोर आला.
कुटुंबीयांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले.