११ वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण; रिक्षा चालकाला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 22:11 IST2019-01-21T22:08:35+5:302019-01-21T22:11:22+5:30

राजमनी यादव असं आरोपीचं नाव असून त्याला २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

11 year old child sexual abuse; Rickshaw driver chains | ११ वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण; रिक्षा चालकाला बेड्या 

११ वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण; रिक्षा चालकाला बेड्या 

ठळक मुद्देमट्या रिक्षा चालकाने ११ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. रिक्षा चालक यादव हा ८ महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशातून मुंबईत आला असून त्याने हे गैरकृत्य ११ वर्षाच्या मुलासोबत केले असे पोलीस निरीक्षक लिमकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मुंबई - १५ जानेवारी रोजी मालवणी परिसरात राहणारा रिक्षा चालक राजमनी यादव (४०) या आरोपीने शेजारी राहणाऱ्या ११ वर्षीय मुलास आपल्या घरी बोलावले. त्यानंतर भामट्या रिक्षा चालकाने ११ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. राजमनी यादव असं आरोपीचं नाव असून त्याला २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रिक्षा चालक यादव हा ८ महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशातून मुंबईत आला असून त्याने हे गैरकृत्य ११ वर्षाच्या मुलासोबत केले असे पोलीस निरीक्षक लिमकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्याला शनिवारी अटक करण्यात आली असून मुलाचा जबाब नोंदविण्यात आला आहे. मुलाने घडलेला सर्व प्रकार घरी आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर आईने मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

Web Title: 11 year old child sexual abuse; Rickshaw driver chains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.