उल्हासनगरात सबडीलरची ११ लाखाची फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: January 2, 2023 16:38 IST2023-01-02T16:37:03+5:302023-01-02T16:38:45+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे गिरीश रामरख्यानी यांनी प्राईड मोटर्स नावाचे शोरूम उघडून, सबडीलर असलेले शहरातील अरुण सिंघानी यांच्याकडून हिरो कंपनीच्या १४ वेगवेगळ्या मोटरसायकली घेऊन, त्यांची परस्पर विक्री केली. तसेच उघडलेले शोरूम बंद केले.

उल्हासनगरात सबडीलरची ११ लाखाची फसवणूक
उल्हासनगर : सबडीलर असलेले अरुण सिंघानी यांनी ओळखीच्या असलेल्या प्राईड मोटर्सचे मालक गिरीष सुरेश रामरख्यांनी यांना हिरो कंपनीच्या ११ मोटरसायकली विक्रीसाठी दिल्या. त्या मोटरसायकली परस्पर विकून ११ लाख ५६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी रामरख्यानी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे गिरीश रामरख्यानी यांनी प्राईड मोटर्स नावाचे शोरूम उघडून, सबडीलर असलेले शहरातील अरुण सिंघानी यांच्याकडून हिरो कंपनीच्या १४ वेगवेगळ्या मोटरसायकली घेऊन, त्यांची परस्पर विक्री केली. तसेच उघडलेले शोरूम बंद केले. सिंघानी यांची एकून ११ लाख ५७ हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी गिरीष रामरख्यानी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.