१० वर्षांचा संसार अन् प्रियकराची एन्ट्री... 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या आरतीचा असा झाला करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:46 IST2026-03-04T15:45:46+5:302026-03-04T15:46:41+5:30

आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय पत्नीची पतीने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली.

10 years of marriage and the entry of a lover... This is how Aarti, who lived in a 'live-in', met a tragic end | १० वर्षांचा संसार अन् प्रियकराची एन्ट्री... 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या आरतीचा असा झाला करुण अंत

AI Generated Image

उत्तर प्रदेशातील शाहजहापूर जिल्ह्यात होळीच्या दिवशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय पत्नीची पतीने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या रक्तरंजित संघर्षात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती आणि प्रियकर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. १० वर्षांच्या वैवाहिक नात्याचा असा भयानक शेवट झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाहजहापूरच्या चौक कोतवाली परिसरातील बालाजी नगर कॉलनीमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. जेव्हा लोक होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडले, तेव्हा त्यांना रस्त्याकडेला एका घराबाहेर महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृतदेहाच्या जवळच तिचा प्रियकर रडत बसला होता, तर काही अंतरावर तिचा पती जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता. हे दृश्य पाहून स्थानिकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

घटस्फोटाचा  खटला आणि प्रेमप्रकरण

मृतक महिलेची ओळख आरती म्हणून झाली आहे. आरतीचा विवाह आरसी मिशन परिसरातील मनमोहन पांडे याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र, गेल्या काही काळापासून आरती आणि मनमोहन यांच्यात वाद सुरू होता आणि त्यांचा न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू होता. दरम्यान, आरती चार-पाच महिन्यांपूर्वी आपल्या पतीला सोडून ब्रिजदीप नावाच्या तरुणासोबत बालाजी नगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहू लागली होती.

सकाळीच गाठले घर आणि सुरू झाला खुनी खेळ

बुधवारी सकाळी आरोपी पती मनमोहन हा आरती राहत असलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या मनमोहनने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने आरतीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी आरतीला वाचवण्यासाठी तिचा प्रियकर ब्रिजदीप पुढे आला असता, मनमोहनने त्याच्यावरही हल्ला केला. प्रत्युत्तरात ब्रिजदीपनेही मनमोहनवर वार केले, ज्यामुळे दोघेही जखमी झाले. मात्र, आरतीवर झालेले वार इतके गंभीर होते की, तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी आरतीला मृत घोषित केले. जखमी पती आणि प्रियकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तिच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे.

Web Title : विश्वासघात और त्रासदी: प्रेम त्रिकोण में पति द्वारा पत्नी की हत्या

Web Summary : शाहजहांपुर में, अपने प्रेमी के साथ रहने वाली एक महिला की उसके पति ने हत्या कर दी। पति ने तेज हथियार से उस पर हमला किया, जिससे उसका प्रेमी भी घायल हो गया। तलाक का मामला चल रहा था। महिला की मौके पर ही मौत हो गई, जिससे स्थानीय लोगों में आक्रोश है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Infidelity and Tragedy: Wife Murdered by Husband in Love Triangle

Web Summary : In Shahjahanpur, a woman living with her lover was murdered by her husband. The husband attacked her with a sharp weapon, also injuring her lover. A divorce case was ongoing. The woman died at the scene, sparking local outrage. Police are investigating.