10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 23:13 IST2019-11-10T23:13:18+5:302019-11-10T23:13:49+5:30
याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला बेड्या
मुंबई - बेपत्ता झालेल्या 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी बलात्कार, हत्या व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
मृत मुलगी 5 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी सीसीटीव्हीच्या पडताळणी संशयीत आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीस तपास करत असताना शनिवारी विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांना घटनास्थळी जाऊन मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यानंतर गळा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भांडुप पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी भा.दं.वि. कलम 302(हत्या), 376(आय) (बलात्कार), 201(पुरावे नष्ट करणे) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) गुन्ह्यांच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.