रामटेक... स्नेहसंमेलन

By admin | Published: February 15, 2015 10:36 PM2015-02-15T22:36:21+5:302015-02-15T22:36:21+5:30

दत्तात्रय हायस्कूल, चाचेर

Ramtek ... affectionate | रामटेक... स्नेहसंमेलन

रामटेक... स्नेहसंमेलन

Next
्तात्रय हायस्कूल, चाचेर
रामटेक : नजीकच्या चाचेर येथील दत्तात्रय हायस्कूल येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. उद्घाटन भगवान रडके यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबूराव झाडे होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंत गाटकिने यांनी केले. याप्रसंगी त्यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल उपस्थितांपुढे मांडला. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, भावगीत स्पर्धा घेण्यात आल्या. समारोपीय कार्यक्रमाला संस्थेचे सचिव राजेंद्र झाडे, बळवंत मोरघडे, सरपंच सविता झाडे, शिक्षण विस्तार अधिकारी गेडाम, खंडाळ्याचे सरपंच मदन बरबटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ramtek ... affectionate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.