शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाची वनविभागाला हुलकावणी

By admin | Updated: January 31, 2017 01:51 IST

अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील

वनविभागाची झोप उडाली : अनेक उपाययोजना करुनही वाघ सापडेना मोहाळी (नलेश्वर) : अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अनेक गावात व शेतशिवारात नरभक्षक वाघाने महिन्याभरापासून धुमाकूळ घालून तीन महिलांना ठार तर दोन महिलांना जखमी केले आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावखेड्यात दहशत निर्माण झालेली असून त्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभाग विविध उपाय व योजना तयार करून त्याला कैद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र तो नरभक्षक वाघ वनविभागाला पाच दिवसांपासून सातत्याने हुुलकावणी देत असल्याने वनविभागाची झोप उडालेली आहे. अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी नेहमीच वाघाच्या हल्ल्यात ठार होत असतात. मात्र अलिकडे एका नरभक्षक वाघाने सातत्याने महिन्याभरापासून गावात व शेतशिवारात धुमाकूळ घालून तीन महिलांना ठार तर दोन महिलांना गंभीररित्या जखमी केले. या घटनेने संपूर्ण सिंदेवाही तालुका दहशतीच्या सावटात आहे. आजही तो नरभक्षक वाघ गाव शेजारी व गावात येत असल्याने गाव खेड्यातील गावकरी रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर पडत नसल्याचे दिसून येते. तर या परिसरातील संपूर्ण रस्ते सायंकाळी ५ वाजतानंतर ओस पडू लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचेही शेतीचे कामे त्या नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे ठप्प पडलेले आहे. नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने विविध उपाय व योजना केल्यात. त्यात जवळपास १५० वन कर्मचारी व अधिकारी, वाघ जेरबंद करणारे तज्ज्ञ, ताडोबा प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी व त्याची चमू, तसेच वाघाला शुटरने गुंगीचे औषध देऊन त्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रंक्युलायझिंग शॉप शुटर हे वाघ पकडण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. परिसरात गस्त घालण्यासाठी जवळपास २० गाड्याचा ताफा, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गावात चार पिंजरे आणि त्यात एका पिंजऱ्यात बकरी, एका पिंजऱ्यात रेडा व दोन पिंजऱ्यात दोन कुत्रे ठेवण्यात आले आहेत तर दोन ठिकाणी मोकळ्या जागेत बकऱ्या बांधून ठेवल्याची माहिती सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी वसंत कामडी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शिवणी वनपरिक्षेत्रात तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून एका पिंजऱ्यात रेडा तर दोन पिंजऱ्यात बकऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तीन ठिकाणी पिंजऱ्याविनाच बकऱ्या बांधून ठेवल्याची माहिती एस.आर. लागडे यांनी दिली. तसेच गावातील वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली दहा युवकांची ३०० रुपये या प्रमाणे मजुरी देऊन गस्त घालण्यात येत आहे. तर दोन ठिकाणी मचानी उभारुन त्याद्वारे पाळत ठेऊन ट्रॅक्युलायझर शॉप शुटर तैनात ठेवले आहेत. असे अनेक उपाय व योजना करुनदेखील आज पाच दिवसांपासून त्या नरभक्षक वाघाने वनविभागाला हुलकावणी देत जवळपास दीडशे वनकर्मचारी व अधिकाऱ्यांची झोप उडवलेली आहे. वनविभागही रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करुन त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी गस्त घालीत आहे. त्यांच्या गस्तीने परिसरात सर्वत्र गाड्यांमुळे उडणारी धूळ दिसून येत आहे. जोपर्यंत तो नरभक्षक वाघ जेरबंद होत नाही, तोपर्यंत या वाघाची दहशत या परिसरात राहणार असल्याने गावकरी चिंतेत आहेत. या भीतीपोटीच अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प पडलेली आहेत. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)