छत्तीसगडमध्ये महिला सशक्तीकरणाची नवी पहाट! मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले ५१ महतारी सदनांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:59 IST2025-09-24T13:56:57+5:302025-09-24T13:59:52+5:30

छत्तीसगडच्या महिलांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.

A new dawn of women empowerment in Chhattisgarh! Chief Minister Vishnu Dev Sai inaugurated 51 Mahatari Sadans | छत्तीसगडमध्ये महिला सशक्तीकरणाची नवी पहाट! मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले ५१ महतारी सदनांचे उद्घाटन

छत्तीसगडमध्ये महिला सशक्तीकरणाची नवी पहाट! मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले ५१ महतारी सदनांचे उद्घाटन

छत्तीसगडच्या महिलांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. 'महतारी सदन' या योजनेअंतर्गत त्यांनी एकाच वेळी राज्यातील ५१ महतारी सदनांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. या सदनांमुळे महिलांना स्व-रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्या राज्याच्या प्रगतीमध्ये सक्रिय योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धमतरी जिल्ह्यातील कुरूद विधानसभा क्षेत्रातील करेली मोठी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे व्हर्च्युअल उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ग्राम संपदा ॲप आणि मनरेगावर आधारित नागरिक माहिती पोर्टलचेही अनावरण केले. 'लखपती दीदी/महतारी सदन' आणि 'माँ अभियान' या पुस्तिकांचे विमोचन करून त्यांनी महिला सशक्तीकरणाच्या दिशेने सरकारच्या कटिबद्धतेवर भर दिला.

महिला सशक्तीकरण सरकारची सर्वोच्च प्राथमिकता!

या सोहळ्यात मुख्यमंत्री साय यांनी जशपूर, बेमेतरा, मुंगेली आणि दुर्ग येथील महिला समूहांशी व्हर्च्युअल संवाद साधला आणि त्यांना महतारी सदन तसेच आगामी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. "गेल्या 19 महिन्यांपासून आमचे सरकार 'मोदींची गॅरंटी' पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. मातृशक्तीला सक्षम करणे हीच आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे ते म्हणाले. या महतारी सदनांमध्ये महिलांना शिलाई, कशिदाकाम, भाजीपाला उत्पादन आणि इतर स्व-रोजगार प्रशिक्षणांसारखे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवता येणार आहेत.

धमतरी जिल्ह्याला ८३ कोटींची विकास भेट

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री साय यांनी धमतरी जिल्ह्यासाठी ८३ कोटींहून अधिक रकमेच्या विकास कामांची घोषणा केली. यात करेली मोठी येथे नवीन महाविद्यालय, कुरूदच्या जी. जामगाव येथे नवीन आयटीआयची स्थापना, तसेच करेली मोठी आणि खट्टी या गावांना एकत्रित करून नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

याव्यतिरिक्त, कुरूद आणि भखारा नगरपंचायतींमध्ये ३० कोटी रुपयांच्या शहरी जलपुरवठा योजनेचा विस्तार, भेण्डरी ते बरोंडा येथे ४५ कोटी रुपये खर्चाचा बंधारा, कुरूद नगरपंचायतीला नगरपरिषदचा दर्जा, आणि विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. उप-मुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही भेण्डरी येथे गौरव पथ बांधण्याची घोषणा केली.

कार्यक्रमात उप-मुख्यमंत्री विजय शर्मा यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 'महतारी वंदन योजने'मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुंगेलीहून उप-मुख्यमंत्री अरुण साव यांच्यासह इतर अनेक खासदार, आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातील सुमारे दोन लाख महिलांनी व्हर्च्युअल माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Web Title: A new dawn of women empowerment in Chhattisgarh! Chief Minister Vishnu Dev Sai inaugurated 51 Mahatari Sadans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.