शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:24 IST

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीकडे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात हॉटेलमध्ये गणिते मांडली जात असतानाच, शिंदेसेनेच्या आमदाराची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या एकहाती सत्तेचे पडसाद आता जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात उमटू लागले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीकडे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात हॉटेलमध्ये गणिते मांडली जात असतानाच, शिंदेसेनेचे दिग्गज आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करून महायुतीला मोठा धक्का दिला आहे.

"माझ्या मतदारसंघात भाजपची फारशी ताकद नाही, त्यामुळे मी तिथे शिवसेना स्वतंत्रपणे लढवणार आहे," असे स्पष्ट करत अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला. यापूर्वी सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीतही सत्तार यांनी असाच पवित्रा घेत भाजपला पराभूत केले होते. आता तोच 'सिल्लोड पॅटर्न' संपूर्ण जिल्हा परिषदेत राबवण्याच्या तयारीत सत्तार दिसत आहेत. महापालिकेत शिंदेसेनेला मिळालेल्या अपयशामुळे निर्माण झालेली मरगळ झटकण्यासाठी सत्तार यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

भाजपचा 'मिशन ६३' आणि जि.प. अध्यक्षपदाचा निर्धार दुसरीकडे, महानगरपालिकेत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर भाजपच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, जिल्ह्यातील ६३ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकून जिल्ह्याचा पहिला भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २०१७ मध्ये भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी एकहाती सत्तेचे स्वप्न भाजपने उराशी बाळगले आहे.

युतीवर प्रश्नचिन्ह एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यस्तरावर युतीसाठी आग्रही असताना, स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमधील दरी रुंदावत चालली आहे. भाजपची तयारी आणि आता सत्तार यांची घोषणा यामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीचे मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसण्याची शक्यता अधिक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : First Announcement: BJP, Shiv Sena to Fight Separately in District Council

Web Summary : Following municipal election fallout, Abdul Sattar declared Shiv Sena will contest independently in the upcoming Zilla Parishad elections, challenging the BJP-Shinde Sena alliance. BJP aims for a majority, fueling uncertainty.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना