शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

केसस्टडीचा शून्य टक्के अहवाल

By admin | Updated: May 16, 2016 23:55 IST

हिंगोली : शंभर टक्के विद्यार्थी प्रगत व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचा केसस्टडी अहवाल सादर करण्यास ३० एप्रिलची डेडलाईन दिली होती.

हिंगोली : शंभर टक्के विद्यार्थी प्रगत व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचा केसस्टडी अहवाल सादर करण्यास ३० एप्रिलची डेडलाईन दिली होती. एकाही तालुक्यातून अहवाल न आल्याने यंत्रणा निद्रिस्तावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.राज्यभरात सध्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जोरात सुरू आहे. जिल्ह्यातही प्रयत्न केले जात आहेत. परंतु या मोहिमेत केसस्टडी अहवालाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पीएसएमच्या माध्यमातून शंभर टक्के विद्यार्थी प्रगतसाठी होण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे आदेश होते. एखाद्या वर्गात एक किंवा दोन विद्यार्थी अद्याप प्रगत झाले नसल्याचे शिक्षण खात्याकडून केलेल्या सर्वेक्षणात आढळले. त्यामुळे शाळा शंभर टक्के प्रगत होऊ शकत नाहीत. त्या प्रगत करायच्या असतील तर, शाळेत गैरहजर किंवा अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून एक ते दीड महिन्यापूर्वी सदर उपक्रमास प्रारंभ झाला. अप्रगत शाळांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. उपक्रमाद्वारे एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, जर राहात असल्यास त्याची कारणे कोणती आहेत. त्यावर उपाययोजना करून ते अप्रगत राहणार नाहीत, याची दक्षता घेणे व या संदर्भाचा केसस्टडी अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संबधित यंत्रणेने सादर करणे अपेक्षित होते. तर त्यांचा पर्यवेक्षीय यंत्रणेकडून चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून घेण्याच्या सूचना होत्या. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होत. ३० एप्रिल रोजी अहवाल शिक्षण विभागाकडे देणे बंधनकारक होते. परंतु एकाही तालुक्याने ही कामे पूर्ण केली नाहीत.