शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईची सुरक्षा ‘पाण्यात’!

By admin | Updated: June 2, 2015 00:36 IST

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे. यामध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक असली तरी एकाही जलतरण तलावावर सुरक्षेसंबंधीचे उपाय करण्यात आले नाहीत. रविवारी हर्सूल तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील सर्वच जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानाच्या पाठीमागे जलतरण तलाव चालविण्यात येतो. त्याचप्रमाणे ज्योतीनगर येथेही मनपाच्या जागेवर बीओटीवर जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. हर्सूल येथेही खाजगी जलतरण तलाव अलीकडेच सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पाचपेक्षा अधिक तलाव आहेत. बहुतांश तलावांवर नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. नवीन पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मागण्यात येत नाही. अनेकांना फिटस्चा त्रास असतो. तलावावर येणारे तरुण याची माहितीच देत नाहीत. त्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडतात. मनपा हद्दीत सुरू असलेल्या जलतरण तलावांसाठी प्रशासनाने कोणतीही नियमावली आजपर्यंत तयार केलेली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जलतरण तलाव चालविणाऱ्यांवर कोणचाही अंकुश राहिलेला नाही. पोेहण्याची हौस अनेकांना असते. या हौसेखातर मित्रांसोबत अनेक जण येतात. आल्यानंतर पोहता येते किंवा नाही याचीही माहिती देत नाहीत. येत नसेल तर लहान हौदात पोहत नाहीत. थेट मोठ्या हौदात जाण्याचा प्रयत्न करतात. लाईफ गार्ड किंवा प्रशिक्षकाची मदत अनेक जण घेतच नाहीत. सोबत आलेल्यांच्या भरवशावर पोहण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेकदा दुर्घटना होण्याची शक्यता असते. नागरिकांनीही अधिक काळजी घेतल्यास दुर्घटना घडणारच नाही. -धनंजय फडके, प्रशिक्षक