शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 11:26 IST

दोन पैकी एक आरोपी अटकेत,एक फरार

ठळक मुद्देपुंडलिकनगर रस्त्यावरील घटनेने खळबळ एक आरोपी अद्याप फरार आहे

औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हनुमाननगर चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावरील नागापूरकर दवाखान्यासमोर घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली.

श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर), असे मृताचे नाव आहे. श्रीकांत  हा शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत होता. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी तो मित्रांसोबत घराबाहेर पडला होता.  हनुमाननगरकडून पुंडलिकनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. तेथील नागापूरकर हॉस्पिटलसमोर अनोळखी तरुणांसोबत त्याचे भांडण झाले. यावेळी मिरवणुकीतील तरुण डी.जे.च्या तालावर नाचत असताना आरोपीने अचानक श्रीकांतच्या छातीत चाकू खुपसला. या घटनेत श्रीकांत खाली कोसळताच मारेकरी तेथून पसार झाले.

या घटनेची माहिती सोबतच्या मित्रांनी त्याच्या घरी कळविली. यानंतर त्याच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन श्रीकांतला बेशुद्धावस्थेत एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रात्री ८.५० वाजता श्रीकांतला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे आणि इतरांनी घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी श्रीकांतचे शव घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी मृताचा भाऊ सूरज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीकांत होता धाकटा मुलगामृत श्रीकांतचे वडील गोपीचंद हे वाळूज एमआयडीसीमधील एनआरबी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा मोठा मुलगा मयूर पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर मधला मुलगा सूरज  पैठण एमआयडीसीतील फार्मा कंपनीत नोकरी करतो. धाकटा श्रीकांत हा बी.ए.चे शिक्षण घेत होता. 

पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्याची घटनास्थळी धावशिवजयंती मिरवणुकीत तरुणाची हत्या झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मारेकऱ्याला पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने चार पथके रवाना करण्यात आली. यात गुन्हे शाखेची दोन पथके आहेत.

एका आरोपीस अटक, एक फरार दरम्यान, श्रीकांतच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले आहे. विजय शिवाजी वैद्य असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राहुल सिद्धेश्वर भोसले असे फरार आरोपीचे नाव आहे. पोलिसांची चार पथके कसून शोध घेत आहेत.