शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रील्स पायी तरुणाईला याड लागलं; वेरूळ लेणी डोंगरावर तरुणींची जीव धोक्यात घालून शूटिंग

By सुमेध उघडे | Updated: June 25, 2024 12:47 IST

सूलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू, पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतांना वेरूळ लेणीतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर: सोशल मिडियात प्रभाव वाढविण्यासाठी रील्सचे मोठे महत्व आहे. मात्र, नावीन्यपूर्ण, कल्पक रील्स बनविण्याचे सोडून तरुणाई जीव धोक्यात घालून नसते उद्योग करत आहेत. रिल्सनं तरुणाईला पछाडलं असून वेरुळ लेणीच्या डोंगरावर रील्स शूट करतानाच धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सूलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू, पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतांना वेरूळच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर स्टार होण्यासाठी तरुणाई कोणत्याही स्तराला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

तरुणांमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाइक, शेअर, व्युजच्या नादात अनेकदा तरुणाई पुढे धोका माहिती असूनही तो पत्करत असल्याच्या घटना समोर आल्या हेत. रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घातल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. आठवडाभरा पूर्वी खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन या धार्मिक पर्यटनस्थळी एक तरुणी कार चालवत असताना तिचा मित्र रील्स शूट करत होता. मात्र रिव्हर्स घेत असताना कार वेगाने डोंगरावरून दरीत कोसळली. या भीषण अपघातात कार खडकावर दोनदा आदळून तरुणी बाहेर फेकली गेली. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कार चालविण्यास देणारा आणि रील्स शूट करणाऱ्या तरुणावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यांतनर पुण्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला. यात पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर काही तरुण जीवघेणा स्टंट करताना दिसले. एक तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास लेणीच्या डोंगरावर धोकादायक रील्स दरम्यान, वेरूळच्या कैलास लेणीच्या बाजूच्या डोंगरावर जीव धोक्यात घालून तरुणी रील्स करताना आढळून आली. एक तरुणी डोंगराच्या कडेला येऊन डान्स करत आहे, तर दुसरी त्याचा व्हिडिओ करत आहेत. डोंगराच्या कडेला नीट उभा राहता येत नाही अशा असुरक्षित ठिकाणी रील्स करताना मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असतानाही या तरुणी रील्स शूट करत होत्या. हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, तसेच यातील तरुण तरुणी कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. 

रील्ससाठी तरुणाई धोका पत्कारायला तयाररील्समधील सर्जनशील, कल्पनेचं कौतुक होतं. मात्र आता या रील्स कलेला विकृत रूप येऊ लागल्याचं दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रील्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रील्स करतात. रील्स बनवण्याचा इतका मोह असतो की, या नादात अनेकांना आपल्या जिवाचीही पर्वा राहात नाही. यावर रील्स स्टारचे स्वयंनियंत्रण आणि स्टंट रील्सवर फिल्टर लावणे हाच उपाय असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद