औरंगाबादेत बाईकवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:10 IST2018-02-16T13:09:07+5:302018-02-16T13:10:45+5:30
जळगाव रोडवरील गोदावरी हायस्कूल जवळ बाईकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला.

औरंगाबादेत बाईकवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात युवक ठार
औरंगाबाद : जळगाव रोडवरील गोदावरी हायस्कूल जवळ बाईकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. हा अपघात सकाळी ७. ३० च्या दरम्यान झाला. शादमान शाहिद अन्वर काझी असे मृताचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, छत्रपती नगर येथे राहणारा शादमान शाहिद अन्वर काझी (१७ ) हा आज सकाळी ७. ३० च्या दरम्यान हडको येथून सिडकोकडे बाईकवरून जात होता. जळगाव रोडवरील गोदावरी हायस्कूलजवळ येताच त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्यामध्ये दुभाजकात असलेल्या लाईटच्या खांबास धडकला. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.