धक्कादायक ! प्रेमविवाहानंतर प्रेयसीचा जबाब सुरु असताना तरुणाची पोलीस ठाण्यावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 20:11 IST2020-11-05T20:08:32+5:302020-11-05T20:11:27+5:30

दोघेही वयाने सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी आणि एक हवालदार पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत त्यांचा जबाब नोंदवीत होते.

The young man jumped out of the police station while his girlfriend was answering after the love marriage | धक्कादायक ! प्रेमविवाहानंतर प्रेयसीचा जबाब सुरु असताना तरुणाची पोलीस ठाण्यावरून उडी

धक्कादायक ! प्रेमविवाहानंतर प्रेयसीचा जबाब सुरु असताना तरुणाची पोलीस ठाण्यावरून उडी

ठळक मुद्देप्रेमविवाह करून जोडपे पोलीस ठाण्यात

औरंगाबाद : पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न करून  पोलीस ठाण्यात आलेल्या नवविवाहित तरुणाने पोलिसांना जबाब देत  असताना  अचानक ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात घडली. 

शेख तौफिक शेख अहेमद (२२, रा. विशालनगर), असे तरुणाचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, विशालनगर येथील रहिवासी तौफिक आणि त्याची २५ वर्षीय प्रेयसी ऑक्टोबर महिन्यात  घरातून पळून गेले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलीस नाईक चव्हाण त्यांचा शोध घेत असताना बुधवारी रात्री तौफिक आणि त्याची प्रेयसी प्रेमविवाह करून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. 

दोघेही वयाने सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी आणि एक हवालदार पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत त्यांचा जबाब नोंदवीत होते. पोलिसांनी त्यांना पळून गेल्यापासून ते लग्न करेपर्यंत आणि परत येथे येण्याचा घटनाक्रम विचारला. त्यांचे म्हणणे नोंदवून घेत असताना तौफिकने अचानक पोलीस ठाण्याच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्याची नवविवाहित पत्नी घाबरली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या वाहनातून तौफिकला घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद पुंडलिकनगर ठाण्यात करण्यात आली.
 

Web Title: The young man jumped out of the police station while his girlfriend was answering after the love marriage