आत्महत्या कशी करावी याचा व्हिडिओ पाहून तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 16:57 IST2021-03-23T16:54:36+5:302021-03-23T16:57:49+5:30

आज पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला, तेव्हा त्याच्या मोबाइलवर आत्महत्या कशी करावी, याबाबतचा व्हिडिओ त्याने पाहिल्याचे दिसून आले.

Young man commits suicide in Sasurwadi after watching a video on how to commit suicide | आत्महत्या कशी करावी याचा व्हिडिओ पाहून तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या

आत्महत्या कशी करावी याचा व्हिडिओ पाहून तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या

ठळक मुद्देहिमायतबाग परिसरातील घटना मृत तरुण कल्याण येथील रहिवासी

औरंगाबाद: पत्नी आणि मुलाला नेण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या तरुणाने यू ट्युब पाहत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. किरकोळ कारणावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्राने सांगितले. ही घटना हिमायतबाग परिसरातील भीमराज नगरात घडली.

सचिन प्रकाश अहिरे (२६, रा. आनंदवाडी, जेतवन कॉलनी कल्याण, जि. ठाणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत सचिनची औरंगाबाद शहरातील भीमराज नगरात सासुरवाडी आहे. माहेरी आलेल्या पत्नी आणि मुलाला नेण्यासाठी तीन-चार दिवसांपूर्वी तो सासुरवाडीत आला होता. तो चार वर्षाच्या मुलाला नेण्यासाठी आल्याचे सांगत होता. त्याची पत्नी आणि सासरची मंडळी मात्र फक्त मुलाला पाठविण्यास नकार देत होते. यावरून त्यांच्यात कुरबुर झाली होती. दरम्यान, रात्री सर्व जण जेवण करून झोपल्यावर सचिनने छताच्या लाकडी बल्लीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आज पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला, तेव्हा त्याच्या मोबाइलवर आत्महत्या कशी करावी, याबाबतचा व्हिडिओ त्याने पाहिल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ पाहून सचिनने गळफास घेतल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्राने दिली. याविषयी बेगमपुरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Young man commits suicide in Sasurwadi after watching a video on how to commit suicide