पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 19:57 IST2021-09-14T19:56:07+5:302021-09-14T19:57:45+5:30
वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता.

पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : ''मी सासरवडीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असून माझ्या संसारात सासू , अत्या ढवळा -ढवळ करीत'', अशा मजकुराची चिठ्ठी लिहित विश्रांती नगर परिसरातील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.१३ रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण नारायण थोरात (वय 29, रा.विश्रांती नगर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.प्रवीण हा एक्सिस बँकेत शिपाई होता. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. प्रवीण हा गेल्या काही दिवसांपासून किरायाच्या खोलीमध्ये राहत होता. त्याची पत्नी आठ महिन्याची गर्भवती आहे. मंगळवार दि.१३ रोजी पत्नी अत्याच्या घरी जेवणासाठी गेली होती. यावेळी घरात एकटाच असलेल्या प्रवीणने राहत्या घरात सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, पत्नी घरी आल्यानंतर घरात आवाज दिला मात्र प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून बघितलं असता प्रवीणने गळफास घेतला होता. यावेळी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.