सिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:10 IST2018-09-21T18:10:00+5:302018-09-21T18:10:32+5:30
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

सिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सिल्लोड (औरंगाबाद ) : शहरातील आंबेडकर नगर येथील एका तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धार्थ केरुबा आरके (३४ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
आरके याच्याकडे चार एक्कर शेती होती. बैकेतून कर्ज काढून त्यानी मोठ्या आशेने शेतात पेरणी केली. मात्र पुन्हा निसर्गाने साथ न दिल्याने व पावसाने पाठ फिरविल्याने हातात काहीच लागले नाही. यामुळे बैंकेचे कर्ज फेडायचे कसे या चिंतेत सिद्धार्थ असायचा.यातूनच गुरुवारी रात्री राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई असा परिवार आहे.