पिकास पाणी देणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:33 IST2018-11-22T17:32:12+5:302018-11-22T17:33:44+5:30
निंभोरा शिवारात तरुण शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

पिकास पाणी देणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून
सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील निंभोरा शिवारात तरुण शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. राहुल सूर्यवंशी असे मृताचे असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल सूर्यवंशी हा तरुण शेतकरी आज सकाळी शेतात पिकांना पाणी देण्याचे काम करत होता. यावेळी अज्ञात इसमाने त्याच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले. यात गंभीररित्या जखमी राहुलचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी कापसाच्या पिकात लपवलेली कुऱ्हाड जप्त केली आहे. गावात घटनेची माहिती कळताच खळबळ उडाली आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरु आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी दिली आहे.