इबोलाचा व्हायरस आपल्याकडे नाहीच

By Admin | Updated: August 22, 2014 00:59 IST2014-08-22T00:43:27+5:302014-08-22T00:59:32+5:30

लातूर : नवा आजार आल्यास समज-गैरसमज असतात. इबोला आजाराचीही लक्षणे अन्य आजाराशी मिळतेजुळते आहेत. त्यामुळे या आजारासंदर्भात गैरसमज होऊन पॅनिक होण्याची शक्यता आहे.

You do not have Ebola virus | इबोलाचा व्हायरस आपल्याकडे नाहीच

इबोलाचा व्हायरस आपल्याकडे नाहीच



लातूर : नवा आजार आल्यास समज-गैरसमज असतात. इबोला आजाराचीही लक्षणे अन्य आजाराशी मिळतेजुळते आहेत. त्यामुळे या आजारासंदर्भात गैरसमज होऊन पॅनिक होण्याची शक्यता आहे. परंतु, इबोलाचा व्हायरस आपल्याकडे सक्रीय नाही. पुण्याच्या प्रयोगशाळेतून तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय असा रुग्ण आपल्याकडे आहे, असे म्हणताही येणार नाही. रोग येत असतात आणि जातही असतात. त्यामुळे इबोलाच्या आजाराशी मिळतेजुळते लक्षणे असल्यावरही पॅनिक होण्याची गरज नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.
आफ्रिकेतील गिनीमध्ये इबोलाचा संसर्ग वाढला. १२ आॅगस्टपर्यंत आफ्रिकन देशातून भारतात आलेल्या नागरिकांची यादी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील रेणापूरचा एक नागरिक इबोला रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी पॅनिक होण्याची गरज नसल्याचे सांगितले. साध्या मलेरिया आजाराची लक्षणे इबोलाशी मिळतेजुळते आहेत. परंतु, इबोलाचा विषाणू कन्फर्म झाल्याशिवाय हा आजार झाल्याचे म्हणताच येत नाही. आफ्रिकन देशात तो झाला हे सत्य आहे. परंतु, आपल्याकडे हा व्हायरस सक्रिय होऊ शकत नाही. त्याचे कारण भारतीय व्यक्ती त्या रुग्णांच्या संपर्कात आलेले नाहीत. या रोगासंदर्भात व्हॉटस् अ‍ॅपवर ज्या पोस्ट पडत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही आजारासंदर्भात काळजी घेणे हाच उत्तम मार्ग असल्याचे मत डॉ. महेंद्र सोनवणे, डॉ. सूरज धूत, डॉ. गजानन चव्हाण, डॉ.आर.टी. भराटे, डॉ. गणपतराव सोमवंशी, डॉ. चेतन सारडा, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सारीपुत भोसीकर यांनी व्यक्त केले.


इबोला तीव्र संसर्गजन्य व्हायरस; पण लातुरातच काय देशभरातही पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत
४इबोलाची लक्षणे अनेक अन्य रोगांसारखी मिळतीजुळती असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे
४लाळ, रक्तस्त्राव, पोट दुखणे, थंडी ताप आदी लक्षणे इबोलाची आहेत.
४प्रतिकारशक्ती वाढविता येते.


इबोलाचा व्हायरस घाम, लाळेद्वारे पसरतो. परंतु, आपल्याकडे या रोगाचा व्हायरस असल्याचे अद्याप तरी कन्फर्म झालेले नाही. त्याचा विषाणूच आपल्याकडे आढळलेला नाही. अन्य रोगातही या आजाराशी संबंधित व्हायरस फ्युअर लक्षणे दिसू शकतात. खूप ताप येणे, थंडी वाजणे ही लक्षणे अन्य आजारातही असतात. त्यामुळे या रोगाला भिण्याचे काही कारण नाही. शिवाय, तो आपल्याकडे आलेलाही नाही, असे डॉ. महेंद्र सोनवणे म्हणाले. व्हायरस तीव्र; पण सक्रियता नाहीच : डॉ. धूत


इबोला हा अति तीव्र संसर्गजन्य व्हायरस आहे. पण भारतात अद्यापही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तसा रुग्ण आढळून आल्यास त्याला आयसोलेटेड वार्डमध्ये ठेवून त्याच्या रक्ताची तपासणी करून पुण्याच्या एनआयव्ही लॅबमध्ये पाठवून देण्यात येते. त्यात जर तो पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतील. तोपर्यंत त्याला सपोर्टेड ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे, असे डॉ. सूरज धूत यांनी सांगितले.

Web Title: You do not have Ebola virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.