हो़ आम्हालाही ओळख मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:12 IST2016-04-04T00:10:56+5:302016-04-04T00:12:23+5:30
नांदेड : हो आम्हालाही आता ओळख मिळाली़़़आम्हीही ताठ मानेने जगण्यासाठी कष्ट करु, समाजासाठीही काम करण्याचा प्रयत्न करु़़़अशा आशादायी शब्दांसह अनेक गरजू महिलांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले़

हो़ आम्हालाही ओळख मिळाली
नांदेड : हो आम्हालाही आता ओळख मिळाली़़़आम्हीही ताठ मानेने जगण्यासाठी कष्ट करु, समाजासाठीही काम करण्याचा प्रयत्न करु़़़अशा आशादायी शब्दांसह अनेक गरजू महिलांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले़ जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने गरजू महिलांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या़ त्याप्रसंगी या महिला भावनिक झाल्या होत्या़
आ़ हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांची उपस्थिती होती़ शिधापत्रिका मिळाल्याच्या समाधानामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक महिला, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता़ जिल्हा पुरवठा विभाग, तहसील आणि एड्स नियंत्रण सोसायटीच्या सेतू सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते़
आ़ पाटील म्हणाले, समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या, वंचित जीवन जगणाऱ्या गरजू महिलांना यापुढेही आवश्यक त्या गोष्टींसाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल़ त्यांच्या समस्याबाबत दखल घेण्यात यावी़ त्यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबींची वेळेवर पूर्तता व्हावी, असा प्रयत्न केला जाईल़ या घटकांची पुढची पिढी शिक्षण-प्रशिक्षण याद्वारे सक्षम व्हावी़ त्यांनी स्वताहाचे मार्ग शोधावेत यासाठीचे उपक्रम आखले जातील़ त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली़ जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले, शिधापत्रिका वाटपाचा उद्देशच या महिलांना ओळख मिळावी हा आहे़ यापुढे गरजू महिलांनी बचत गट स्थापन केल्यास त्या गटाला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना देण्याचा प्रयत्न राहिल़ ज्यामुळे त्यांना शिधापत्रिका मिळणे आणि वेळेवर अन्नधान्याचा पुरवठा करणे या गोष्टी साध्य करता येतील़ (प्रतिनिधी)