शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या औषधोपचाराने बैल दगावला

By admin | Updated: July 12, 2014 00:41 IST

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलेल्या बैलावर चुकीचे औषधोपचार झाल्याने सदरील जनावर दगावल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली.

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलेल्या बैलावर चुकीचे औषधोपचार झाल्याने सदरील जनावर दगावल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली. कर्तव्यावर गैरहजर असलेल्या प्रभारी पशुधन विकास अधिकाऱ्याने दिलेल्या सल्ल्यानुसार दवाखान्यातील परिचराने हे उपचार केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.गोरेगाव येथील शेतकरी पांडुरंग वामनराव कावरखे यांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या आजारी बैलास उपचारासाठी गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी गुरांचे डॉक्टर हजर नसल्याने परिचर सय्यद अल्लाऊद्दीन यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही.एल. गिरी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार सुरू केले.या उपचारादरम्यान सदरील बैल दगावल्याने पांडुरंग कावरखे यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत कावरखे यांनी पशुधन अधिकारी गिरी प्रत्यक्ष हजर नसताना परिचरने केलेल्या चुकीच्या औषधोपचारामुळे बैल दगावल्याची तक्रार गोरेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यावरून जमादार टी.एस. गुव्हाडे यांनी पंचनामा केला. तसेच बैलाच्या विच्छेदन अहवालानंतर चौकशी करून या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)