शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात महामानवाला वंदन

By admin | Updated: April 15, 2016 01:42 IST

हिंगोली : शहरासह जिल्हाभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त भरगच्च कार्यकमांचे आयोजन केले होते.

हिंगोली : शहरासह जिल्हाभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त भरगच्च कार्यकमांचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी असलेल्या कार्यक्रमांबरोबरच मिरवणुकांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग वाखाणण्याजोगा होता.शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती असल्याने यावेळी अनेक भागात नियोजनपूर्वक उपक्रमांची आखणी केल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर प्रशासकीय सहभागाचीही काही कार्यक्रमांना किनार असल्याने शहरात आंबेडकरमय वातावरण झाले होते. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठ्या होर्डिंग्ज दिसून येत होत्या. दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास विविध भागातून मिरवणुका निघण्यास प्रारंभ झाला. ढोल-ताशा, डिजेच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये विविध कवायती, गीतगायन आदींनी लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत होते. पांढऱ्या पारंपरिक पोशाखात निघालेल्या शिस्तबद्ध मिरवणुका हेही यावेळचे अनेक भागातील वैशिष्ट्ये होते. सायंकाळी सहानंतर तर रामलीला मैदान, पुतळा परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विविध भागातील जयंती मंडळांच्या मिरवणुका दाखल झाल्याने निळ्या पाखरांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने मिरवणुकांचा आनंद लुटत होते. (जिल्हा प्रतिनिधी)