शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 11:59 IST

अपघात विभागाच्या पायऱ्यांवरच जखमीचा अनेक तास पडून असताना मृत्यू

ठळक मुद्देजिवंतपणी कोणी पाहिले नाही; पण मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणेची धावपळमाहिती दिल्यानंतरही उपचारासाठी दोन तास कोणीच आले नाही

औरंगाबाद : पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माश्या घोंगावत होत्या, अशा अवस्थेत एक व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होता, येणारे-जाणारे पाहून पुढे जात होते. पण काहींनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्याला अपघात विभागात दाखल करण्यासाठी यंत्रणेने धावपळ केली.

घाटीतील अपघात विभागासमोर पडून असलेल्या या व्यक्तीविषयी के.के. ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे, अक्षय दांडगे यांनी डाॅक्टरांना माहिती दिली. परंतु त्यानंतरही कोणीही वेळीच दखल घेतली नाही, अशी ओरड होत आहे. सदर व्यक्तीला कोणीतरी घाटीत सोडून गेल्याची शक्यता घाटी प्रशासनाने व्यक्त केली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, या व्यक्तीला ज्यांनीही घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. या व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी अपघात विभागात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याची ओळखी पटलेली नाही.

..तर वाचले असते प्राणएका कोरोना रुग्णाला दाखल करताना अपघात विभागासमोर सदर व्यक्ती पडून असल्याचे दिसले. त्याच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या झाल्या होत्या. तोपर्यंत तो जिवंत होता. त्याविषयी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. तसेच ‘आरएमओ’ यांनाही माहिती दिली. पण दोन तासांनंतरही कोणीही आले नाही. शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वेळीच त्याच्यावर उपचार केले असते तर प्राण वाचले असते, असे के.के. ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे म्हणाले.

टॅग्स :Deathमृत्यूgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद