शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहातील जेवणात किडे; मुली जेवणाच्या ताटासह थेट तहसील कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:44 IST

वैजापूर येथील शासकीय वसतिगृहातील प्रकार; समाजकल्याण अधिकाऱ्यांची वसतिगृहाला भेट

वैजापूर : येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणात गुरुवारी किडे आढळले. यामुळे जेवण न करता मुलींनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांकडे तक्रार दिली.

ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून शासनाच्या वतीने वैजापूर येथे शिवराई रस्त्यावर वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात सध्या ग्रामीण भागातील ७५ मुली शिक्षणासाठी राहतात. त्या मुलींना दररोज नाश्ता, जेवण व फळे दिली जातात. मात्र दिल्या जाणाऱ्या नाश्ता व जेवणात अनेकवेळा किडे आढळत असल्याची तक्रार वसतिगृहातील मुलींनी अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच नेहमी फळेही सडकी दिली जात असल्याचे सांगितले होते, मात्र याची कोणीही दखल घेतली नाही. गुरुवारी जेवणातही मुलींना किडे, अळ्या आढळल्या, त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वच मुलींनी जेवण न करता सदर जेवणाचे व सडक्या फळांचे नमुने घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले व तेथे वसतिगृह प्रशासनाविषयी रोष व्यक्त करून ठिय्या आंदोलन केले. यानंतर तहसीलदारांनी सदर मुलींचे निवेदन स्वीकारले.

समाजकल्याण अधिकाऱ्यांची वसतिगृहाला भेटवसतिगृहात मुलींना नेहमी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. हे जेवण पुरविण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे. जेवणाविषयी कायम तक्रारी असताना शासकीय वसतिगृहाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. वाॅर्डन नेहमी गैरहजर राहतात. अशी मुलींची तक्रार आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी वसतिगृहास भेट देऊन मुलींच्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी