शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सासणे यांचा विश्‍वविक्रम

By admin | Updated: January 30, 2015 14:43 IST

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी परभणी येथे चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात २९ जानेवारी रोजी विश्‍वविक्रम प्रस्थापित केले

परभणी : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी परभणी येथे चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात २९ जानेवारी रोजी विश्‍वविक्रम प्रस्थापित केले असून, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड या विश्‍वविक्रमांची नोंद घेणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी अनेक विश्‍वविक्रम केले आहेत.परभणी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांनी चार क्रीडा प्रकारात विश्‍वविक्रम करण्याचा मानस केला होता. त्यानुसार जिल्हा क्रीडा संकुल येथे २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता विश्‍वविक्रमाच्या प्रात्याक्षिकांना प्रारंभ केला. सासणे यांनी स्टेपअपस्, पुशअपस्, एका हाताने पुशअपस् व पुशअप साईड जम्प या चार प्रकारांचे प्रात्याक्षिक सादर केले. चार क्रीडा प्रकारांसाठी प्रत्येकी एक मिनिटाचा कालावधी देण्यात आला होता. यामध्ये स्टेपअपस् या प्रकारात सासणे यांच्या पाठीवर ३६ किलो वजन ठेवून त्यांना स्टेपअपस् काढायच्या होत्या. यात त्यांनी ४८ स्टेपअप काढून विश्‍वविक्रम केला. याच प्रकारात रॉबर्ट नाटोली यांच्या नावे ४१ स्टेपअपचा विश्‍वविक्रम होता. दुसर्‍या प्रकारात पुशअप्मध्ये सासणे यांच्या पाठीवर २८ किलो वजन ठेवण्यात आले होते. यामध्ये सासणे यांनी एका मिनिटात ५६ पुशअपस् काढल्या. या प्रकारात हिरो युकी याने ५0 पुशअपस् काढून यापूर्वी विश्‍वविक्रम केला होता. तिसर्‍या क्रीडा प्रकारात एका हाताने पुशअप काढण्यात येणार होते. यामध्ये त्यांच्या पाठीवर १८ किलो वजन ठेवून एका मिनिटात सासणे यांनी ४७ पुशअप काढल्या. या प्रकारात निल ब्रायंट याच्या नावे ३३ पुशअप काढल्याची नोंद आहे. चौथ्या प्रकारात पुशअप साईड जम्पमध्ये सासणे यांनी यापूर्वी२0 साईड जम्प काढून विक्रम निर्माण केला होता. त्यांचाच विक्रम मोडीत काढण्याचे आव्हान या प्रकारात त्यांच्यासमोर होते. त्यांनी एका मिनिटात ३२ पुशअप साईड जम्प सादर केल्या.या विश्‍वविक्रम नोंदीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा संकुलात १0 बाय १0 चा मंच तयार करण्यात आला होता. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार येथील यंत्रणा उभारण्यात आली होती. एक तास २0 मिनिटांमध्ये या चार क्रीडा प्रकारात सासणे यांनी विश्‍वविक्रम निर्माण केले. प्रत्येक क्रीडा प्रकारानंतर काही वेळांसाठी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पथक कार्यान्वित होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर पुढील क्रीडा प्रकार सादर करण्यात येत होता. विश्‍वविक्रमाची नोंद घेण्यासाठी औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय अँथलेटीक संघटनेचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी हे परीक्षक म्हणून या ठिकाणी आले होते. त्यांच्या समवेत खो-खो, कबड्डी संघटनेचे राष्ट्रीय प्रशिक्षक महेश खर्डेकर, पुनम नवगिरे, बालाजी सिरसीकर यांनी काम पाहिले. संपूर्ण विश्‍वविक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सुभाष सासणे यांनी विश्‍वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, उपमहापौर भगवान वाघमारे, जि.प. गटनेते बाळासाहेब जामकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश रणखांब, सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, उपायुक्त दीपक पुजारी, तहसीलदार संतोष रूईकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, पोलिस निरीक्षक संजय हिबारे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस यांनी केले./(प्रतिनिधी) 

 ■ विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. सासणे यांनी एक-एक विक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उभे राहून जल्लोष केला. खेळाडूंना सहकार्य करावे४/उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना अधिकार्‍यांसह राजकीय पदाधिकार्‍यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा विश्‍वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर मेजर सुभाष सासणे यांनी व्यक्त केली. ■ साईड पुश अप प्रकारात विश्‍वविक्रम नोंदविताना मेजर सुभाष सासणे. दुसरे छायाचित्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे. आजचा विश्‍वविक्रममेजर सुभाष सासणे ४८ स्टेपअप्स्मेजर सुभाष सासणे ५६ पूशअप्स्मेजर सुभाष सासणे ४७ पूशअप्स्सुभाष सासणे ३२ पूर्वीचा विश्‍वविक्रमरॉबर्ट नाटोली (युएसए) ४१ स्टेपअप्स्हिरो युकी (जपान) ५0 पूशअप्स्नील ब्रायंड (ऑस्ट्रोलिया) ३३ पूशअप्स्सुभाष सासणे २0 पूशअप्स् एका हाताने पुशअप करताना सासणे प्रकारस्टेपअप्स्- वजन ८0 पौंडपूशअप्स् वजन- ६0 पौंडपूशअप्स् एका हाताने वजन- ४0 पौंडसाईड जम्प पूशअप्स्