कामे दर्जाची, प्रतीक्षा पावसाची

By Admin | Updated: September 2, 2015 23:30 IST2015-09-02T23:30:46+5:302015-09-02T23:30:46+5:30

बीड : जलयुक्त शिवार अभियनांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे पुर्ण झाली आहेत. डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या अभियनातील कामे योग्य पद्धतीने झाली

Works quality, wait for rain | कामे दर्जाची, प्रतीक्षा पावसाची

कामे दर्जाची, प्रतीक्षा पावसाची


बीड : जलयुक्त शिवार अभियनांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे पुर्ण झाली आहेत. डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या अभियनातील कामे योग्य पद्धतीने झाली असून कामाची ‘रिझल्ट’ पाहण्यसाठी आता मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
पहिला टप्पा पुर्ण करण्यासाठी जिल्ह्याला २२ कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. गावातील शिवार जलयुक्त करण्यासाठी विविध विभागांतर्गत कामांना सुरवात करण्यात आली होती. जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याने अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तर सचिव म्हणून जिल्हा कृषी अधिक्षक यांनी काम पाहिले आहे. प्रशासकीय नियोजनानुसार पहिला टप्पा आॅक्टोंबर मध्ये पुर्ण होणार होता. मात्र, पावसाचा कामात व्यत्ययच आला नसल्याने जलयुक्तचे काम अखंडपणे सुरू राहिले परिणामी दोन महिने अगोदरच पहिल्या टप्प्यातील कामे पुर्णत्वाकडे आहेत. यामध्ये २७१ गावांत ३८०३ ऐवढी कामे सुरू होती. पैकी ३५३८ ऐवढी कामे पुर्ण झाली आहेत. यामध्ये कृषी विभागाकडे ३०४२ कामे होती पैकी २९८७ कामे पुर्ण केली आहेत. यामध्ये कृषीविभागाने शेततळे, नविन नाला बंडिंग, जुन्या नाल्यांना उभारी दिली आहे.
सर्वाधिक कामे कृषी विभागने पूर्ण केली असून मंजुर निधीपैकी केवळ २० टक्केच निधी खर्ची केला आहे. नविन कामांपेक्षा जुन्या कामांना उभारी दिल्याने कमी खर्चात अधिक कामे झाली आहेत. विविध विभागांतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, नियमीत सलग समतल चर, खोल सलग समतल चर, माती नाला बंडिंग, नाल्यांचे दुरूस्तीकरण, शेततळे अशी १३ प्रकारची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. नाल्याचे दुरूस्तीकरण व शेतळ्याचा अधिक परिणाम झाला आहे. अभियनाच्या सुरवातीच्या काळात शेततळ्याकरिता जागा देण्यास शेतकरी नकार देत होते. मात्र, कामे पाहून शेतकरीच कामांची मागणी करू लागले आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यास कामांचा परिणाम दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Works quality, wait for rain