शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थ झाले दूर

By admin | Updated: October 12, 2014 12:11 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत.

 

परभणी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत. त्यामुळे या पुढार्‍यांची चांगलीच पंचाईत होऊ लागली आहे. 
ग्रामीण भागातील नेते अथवा पुढारीपण करणार्‍यांकडे ग्रामस्थ आपल्या अडीअडचणी किंवा शासकीय कामे करून घेण्यासाठी धावाधाव करतात. परंतु, हे पुढारी त्या वेळी भाव खाऊन जातात. हा आपला, तो त्याचा असे म्हणून ग्रामस्थांची कामे खोळंबून ठेवतात. त्यामुळे अनेक गावातील पुढार्‍यांना चांगले दिवस आले होते. परंतु, ग्रामस्थ ही दर पाच वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीची वाट पाहून असतात. निवडणुका लागल्या गाव पुढार्‍यांना ग्रामस्थ व सोयर्‍या-धायर्‍यांची गरज भासू लागते. अशा वेळी मात्र हे सगेसोयरे व ग्रामस्थ गाव पुढार्‍याला व कार्यकर्त्यांना अद्दल घडविण्यासाठी विविध युक्त्या लढवित असतात. 
सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी या गावपुढार्‍यांना मतदारांची (ग्रामस्थांची) गरज भासू लागली आहे. हे ग्रामस्थ या गाव पुढार्‍यांना पाहून तोंड वळवित दुसर्‍या दिशेने जात आहेत. त्यामुळे या गावपुढार्‍यांची चांगलीच गोची होत आहे. (प्रतिनिधी)
आता मतदार खाऊ लागले भाव
■ जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. सध्या उमेदवारांना एक-एक मतांचे पडले आहे. त्यासाठी उमेदवार वत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मतदारांना भेटण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. आमच्याच पक्षाला व नेत्याला मतदान करा, असे सांगत आहेत. उमेदवार गावात तर शेतकरी (मतदार) शेतात अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.
 ■ गावातील मतदार एवढे आमच्या जवळचे आहेत, असे गावपुढारी उमेदवारांना पटवून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर हे गावपुढारी (नेत्यांकडून) उमेदवारांकडून आपले फायदे करून घेतात आणि ग्रामस्थांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे आता मतदारही भाव खाताना दिसत आहेत.