शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

उपाशी पोटी धडपडणाऱ्या जिवांसाठी उभी राहिली ‘महिला धान्य बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:37 AM

हजारो लोकांचे पोट भरण्यात यश 

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात ‘मैत्र मांदियाळी’चा उपक्रम३५० महिला सदसस्या कार्यरत

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : कुठे पंचपक्वान्नाने भरलेले ताट, तर कुठे उपाशीपोटी झोपणारे जीव, अशी दोन टोके आपल्या अवतीभवती सहज दिसून येतात. खपाटीला गेलेले पोट, कृश बालके, असे विदारक चित्र त्यांना अस्वस्थ करून गेले. कोणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून त्यांनी मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान अंतर्गत महिला धान्य बँक सुरू केली. 

प्रत्येक उपाशी जिवापर्यंत अन्न पोहोचावे, या उद्देशाने जालना येथील मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय किंगरे यांनी ‘धान्य बँक’ या योजनेची संकल्पना मांडली आणि प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्यांनी झपाटून काम करत अल्पावधीतच जालना जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. या उपक्रमाचा सर्व कारभार महिलांकडून पाहिला जातो, म्हणून ‘महिला धान्य बँक’ म्हणून हा उपक्रम ओळखला जातो. जालना जिल्ह्यात जानेवारी- २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली असून, आजपर्यंत हजारो लोकांचे पोट भरण्यात सदस्यांना यश मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत महिला धान्य बँकेच्या सदस्यांकडून आपापल्या परिसरातील किंवा ओळखीच्या महिलांना दर महिन्याला दोन किलो गहू देण्यासाठी आवाहन केले जाते. दोन किलो गव्हाची किंमत साधारणपणे ६० रुपये एवढी गृहीत धरून ज्यांना गहू द्यायचे असतील त्यांनी गहू किंवा ज्यांना पैसे द्यायचे असतील त्यांनी पैसे द्यावेत, असे सुचविले जाते. 

ग्रामीण जनतेनेही घेतली प्रेरणा या उपक्रमांतर्गत चालणारे काम पाहून जालना जिल्ह्यातील चंदनहिरा गावातील लोकांनी प्रेरणा घेतली असून, त्यांच्या गावातही धान्य बँकेला सुरुवात केली आहे.

३५० महिला सदसस्या कार्यरतहा उपक्रम फक्त काही लोकांपुरता मर्यादित राहू नये म्हणून एका महिलेने कमीत कमी पाच महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. सध्या या उपक्रमांतर्गत ३५० महिला सदस्य कार्यरत आहेत. ही संख्या १००० पर्यंत नेण्याचा मानस असल्याचे काही सदस्यांनी सांगितले. ३०० पेक्षाही अनेक कुटुंबे नियमितपणे या उपक्रमाशी जोडल्या गेले आहेत. 

5200 किलो धान्य जमा उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत धान्य बँकेने ५२०० किलो धान्य जमा केले आहे. यापैकी शांतीवन येथील दुष्काळी छावणीसाठी २१०० किलो तांदूळ पाठविण्यात आला असून, अन्नयज्ञ संस्थेला २५०० किलो धान्य पाठविण्यात आले आहे. गरजू कुटुंबांनाही जवळपास २०० किलो धान्य वाटप करण्यात आले आहे. जालनासोबतच महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधील दानशूर व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या असून, अवघ्या महाराष्ट्रातूनच मदतीचा ओघ सुरू आहे. 

सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळालेले गहू किंवा पैसे संकलित करून बँकेत जमा करण्यात येतात आणि नंतर ही मदत जालना येथील अन्नयज्ञ या संस्थेला दिली जाते. ६० रुपये प्रतिमहिना याप्रमाणे ७२० रुपये प्रतिवर्ष एवढी रक्कम देणे अनेकांना सहजशक्य असल्यामुळे या उपक्रमाला सुरुवातीपासूनच अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सदस्यांनी सांगितले. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबादJalanaजालना