अज्ञात वाहनाच्या धडकेने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:35 IST2019-03-04T22:34:51+5:302019-03-04T22:35:10+5:30
मार्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी वाळूजच्या लांझी टी पॉइंटजवळ घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेने महिला ठार
वाळूज महानगर : मार्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी वाळूजच्या लांझी टी पॉइंटजवळ घडली. जुबेदाबी जलील शेख (४५ रा.साठेनगर, वाळूज) असे मृत महिलेचे नाव असून, नंदाबाई पांडुरंग राऊत (४२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे.
वाळूज येथील जुबेदाबी जलील शेख व नंदाबाई राऊत या दररोज मार्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात. दोघी सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगररोडवर मॉर्निंग वॉक करत होत्या. लांझी-टी पॉइंटजवळून जात असताना औरंगाबादहून नगरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली.
यानंतर दोघीही च्या चालकाने सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास या दोघींना पाठीमागुन जोराची धडक दिली. भरधाव वाहनाच्या धडकेने जुबेदाबी शेख रस्त्याच्या विरुध्द दिशेने पडल्या.नंदाबाई यांनाही वाहनाचा धक्का लागल्याने त्या रस्त्याच्या कडेला पडल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी जुबेदाबी शेख मृत घोषित केले. तर नंदाबाई राऊत यांच्यावर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत जुबेदाबी शेख या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील मूळ रहिवासी असून, शवविच्छेदनानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी मूळगावी भालगाव येथे घेऊन गेले.