शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनीच रचले सरण अन् दिला अग्निडाग

By admin | Updated: December 29, 2014 00:58 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड सरणावर जाताना मला इतकेच कळले होते जगण्याने केली सुटका मरणाने छळले होते

व्यंकटेश वैष्णव , बीडसरणावर जाताना मला इतकेच कळले होतेजगण्याने केली सुटकामरणाने छळले होतेया सुरेश भटांच्या ओळीला अक्षरश: माणसानेच तडा दिला. परळीत स्रेहनगर भागात रहाणाऱ्या सुनीता (वय-४५ नाव बदलले आहे) या देहविक्रेय करणाऱ्या महिलेला जगण्याने तर छळलेच, परंतु मृत्यूनंतर सुध्दा तिच्या विटाळलेल्या शरीराला हात लावण्यास नातेवाईकांनी नकार दिला. मात्र मुक्तांगणच्या आशा मडके व इतर महिलांनी पुढे येऊन तिला खांदा दिला. एवढेच काय महिलांनीच सरणही रचले अन् शनिवारी अग्नीडागही दिला.एकेकाळी देहविक्रेय करणाऱ्या व चंगळवादी समाजाचा बळी ठरलेल्या सुनीताला जिवंतपणी नरक यातना सोसाव्या लागल्या. मात्र मरणा नंतर देखील तिची हेळसांड थांबली नाही. शुगरच्या आजारामुळे मागील सहा महिन्यांपासून आजारी असलेल्या सुनीताचा मुत्यू शनिवारी झाला. सुनीताला एक तीस वर्षांचा मुलगा आहे. मात्र तो आईला (सुनीताला) सांभाळत नसल्यामुळे सुनीताचे आयुष्य एकाकी झाले होते. देहविक्रेयाच्या व्यवसायातून बाहेर पडू पहाणारी सुनीता २०१२ दरम्यान मुक्तांगण संस्थेच्या सहवासात आली. येथे तिला मुक्तांगणच्या आशा मडके यांनी तिचे पूनर्वसन केले. तिला वेश्या व्यवसायातून बाहेर काढले होते. इतरांप्रमाणे आपणही जीवन जगावे या तिच्या इच्छेमुळे सुनाताने देहविक्रेय करण्याचा व्यवसाय सोडून देवून मिळेल तिथे काम करण्याचे सुरू केले. या दरम्यानच सुनीताला शुगरच्या आजाराने घेरले. मागील दोन महिन्यांपासून ती शासकीय रूग्णालयात उपचार घेत होती. मात्र गुण आला नाही. यात तिचा मुत्यू झाला. मुत्यूनंतर तिच्या काही नातेवाईकांनी तिचा अंत्यविधी करण्यास नकार दिला. अशा बिकट परिस्थितीत मुक्तांगणच्या आशा मडके यांनी पुढाकार घेतला. मुक्तांगण अंतर्गत काम करणाऱ्या कमल जोगदंड, अर्चना कळसे, मीरा लहाने, शांताबाई कांबळे, अनुसया सावंत या महिलांनी एकत्र येऊन सुनीताला स्मशानभूमीत आणले. स्मशानभूमीत सरण रचण्याचे काम देखील महिलांनीच केले. याप्रसंगी मुलगा प्रचंड दारू पिलेला असल्याने त्याला आपल्या आईला (सुनीताला) अग्नीडाग देणे शक्य नसल्याने मुक्तांगणच्या आशा मडके यांनीच अग्नीडाग दिला असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.तिच्या अंत्यविधीला ना तिचे कोणी नातेवाईक आले, ना आसपास राहणारे लोक. दुसऱ्याच्या शरीराची भूक भागविण्यासाठी स्वत:च्या शरीराकडे लक्ष न दिलेल्या सुनीताला मरणानंतरही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. ४देहविक्रेय करण्याच्या व्यवसायातून बाहेर पडल्या नंतर मुक्तांगणच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे निराधार योजने अंतर्गत मानधनासाठी अर्ज केला होता. मानधन मिळविण्यासाठी सुनीताने एक वर्ष प्रशासनाकडे हेलपाटे मारले. गेल्या महिन्यात सुनीताला निराधाराची पगार मंजूर झाली. मात्र आता त्या पैशाचा लाभ घेण्यासाठी तीच या जगात उरली नाही. असे आशा मडके यांनी सांगितले.