सोयाबीन मशीनमध्ये सापडून महिलेचा हात तुटला

By Admin | Updated: November 25, 2014 00:57 IST2014-11-25T00:36:53+5:302014-11-25T00:57:15+5:30

नळदुर्ग : सोयाबीनच्या मशीनवर काम करीत असताना एका महिलेचा हात तुटल्याची घटना १७ आॅक्टोबर रोजी अणदूर (ता़तुळजापूर) शिवारात घडली़

The woman's hand fell into soya bean machine and lost her hand | सोयाबीन मशीनमध्ये सापडून महिलेचा हात तुटला

सोयाबीन मशीनमध्ये सापडून महिलेचा हात तुटला


नळदुर्ग : सोयाबीनच्या मशीनवर काम करीत असताना एका महिलेचा हात तुटल्याची घटना १७ आॅक्टोबर रोजी अणदूर (ता़तुळजापूर) शिवारात घडली़ या प्रकरणी शुक्रवारी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अणदूर येथील जनाबाई भागवत वऱ्हाडे (वय-३८) ही महिला १७ आॅक्टोबर रोजी मोहन घुगे यांच्या शेतातील सोयाबीन खळ्यावरील कामासाठी गेली होती़ त्यावेळी मशीन मालक बंडू रूपन्ना चव्हाण (रा़ अणदूर) जाळीवर हात फिरविण्यास सांगितले़ त्यावेळी जनाबाई वऱ्हाडे यांनी ते काम येत नसल्याचे सांगितले़ त्यानंतरही चव्हाण याने त्या महिलेस जाळीवर हात फिरवायला लावला़ यावेळी तिचा हात मशीनमध्ये अडकून तुटल्याने ती गंभीर जखमी झाली़ जखमी महिलेने औषधोपचारानंतर शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: The woman's hand fell into soya bean machine and lost her hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.