स्मार्ट गुन्हेगाराचा डाव उलटला; पोर्न मेसेज पाठवलेल्या महिलेसोबतच तक्रार देण्यास आला अन्‌ जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:25 PM2020-12-02T12:25:04+5:302020-12-02T12:34:29+5:30

cyber crime news आठवडाभरापूर्वी महिलेच्या व्हॉटस्‌ॲप नंबरवर अनोळखी इसमाने अर्धनग्न अवस्थेतील फोटो पाठविले.

The woman who sent the porn message came to lodge a complaint and got caught in the trap | स्मार्ट गुन्हेगाराचा डाव उलटला; पोर्न मेसेज पाठवलेल्या महिलेसोबतच तक्रार देण्यास आला अन्‌ जाळ्यात अडकला

स्मार्ट गुन्हेगाराचा डाव उलटला; पोर्न मेसेज पाठवलेल्या महिलेसोबतच तक्रार देण्यास आला अन्‌ जाळ्यात अडकला

googlenewsNext
ठळक मुद्देअश्लील फोटो व संदेश पाठविणारा पकडलाचौकशी केली असता त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली.

वाळूज महानगर : उद्योगनगरीतील एका ३० वर्षीय महिलेच्या व्हॉटस्‌ॲपवर  अश्लील फोटो व संदेश पाठविल्यानंतर मदतीचा बहाणा करून आरोपी तरुण  पीडितेसोबतच तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. मात्र, तो अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

काही दिवसांपूर्वी पीडित महिला पतीसह बजाजनगरात किरायाच्या घरात राहत होती. पती-पत्नीत वाद झाल्यामुळे ती पतीपासून विभक्त होऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली होती. आठवडाभरापूर्वी तिच्या व्हॉटस्‌ॲप नंबरवर अनोळखी इसमाने अर्धनग्न अवस्थेतील फोटो पाठविले. २३ नोव्हेंबरला पुन्हा त्या अनोळखी इसमाने हाच प्रकार केला. यामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने पूर्वी बजाजनगरात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा अजय लोंढे (२०) याला मदत मागितली. त्याने होकार दिल्यानंतर पीडित महिला त्याच्यासह सोमवारी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. 

पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांची नजर अजयवर गेली. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता दोन सीमकार्ड मिळून आले. यातील एका सीमकार्डवरून अजयने अश्लील फोटो व संदेश पाठविल्याचे उघड झाले. अजय लोंढेला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल आहे.

Web Title: The woman who sent the porn message came to lodge a complaint and got caught in the trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.