खुलताबाद येथे बसच्या धडकेत महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:42 IST2018-07-30T12:41:50+5:302018-07-30T12:42:49+5:30
तालुक्यातील पळसवाडी येथे आज पहाटे बसच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

खुलताबाद येथे बसच्या धडकेत महिला जागीच ठार
खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील पळसवाडी येथे आज पहाटे बसच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. विमलबाई जयराम सातदिवे (वय 54 ) असे मृत महिलेचे नाव आहे.
विमलबाई या वन विभागात वन मजूर म्हणून कार्यरत होत्या. आज पहाटे त्या सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रात : विधी साठी जात होत्या. यावेळी औरंगाबाद - नंदुरबार या बसने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव चव्हाण, शरद दळवी, शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. बस चालक भास्कर नागरे खुलताबाद पोलीस ठाण्यात हजर झाला असून अपघाताची खुलताबाद ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.