शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिला उतरल्या रस्त्यावर

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

नांदेड: शहर व जिल्ह्यात सध्या अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन असलेला मटका खुलेआम सुरु आहे़ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर मटका बुकींनी आपली कार्यालये थाटली आहेत़

नांदेड: शहर व जिल्ह्यात सध्या अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन असलेला मटका खुलेआम सुरु आहे़ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर मटका बुकींनी आपली कार्यालये थाटली आहेत़ विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलिस ठाण्याच्या समोरच पहावयास मिळाला़ त्या विरोधात आता या भागातील महिलांनी पुढाकार घेतला असून पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे़जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मटका खेळला जात आहे़ पोलिसांकडून त्यांच्यावर होणारी कारवाईही अनेकवेळा संशयाच्या भोवऱ्यात सापडते़ त्यामुळे शहरातील मटका बुकींना जोर आला आहे़ शिवाजीनगर, इतवारा, नांदेड ग्रामीण, विमानतळ व भाग्यनगर या पाचही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पानटपरीपासून ते चहा कँटिन, हॉटेल, केशकर्तनालय आदी ठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्या फाडण्यात येत आहेत़ तर काहींनी तंत्रज्ञानाचा उपयोग करीत मोबाईलवर एसएमएसद्वारे मटका घेण्याचा फंडा सुरु केला आहे़ शिवाजीनगर हद्दीतील नवी आबादी, आंबेडकरनगर, जयभीमनगर, गोकुळनगर, विष्णूनगर, नवीन मोंढा या भागात तर मटका बुकींनी आपली कार्यालये थाटली आहेत़ या ठिकाणी खुलेआमपणे भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मटका खेळला जातो़ मागील वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात मटका खेळण्याच्या कारणावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाला होता़ या पार्श्वभूमीवर मटका बुकींवर व खेळणाऱ्यांवर आळा घालण्याची मागणी होत आहे़ विशेष म्हणजे, शिवाजीनगर हद्दीत तर पोलिस ठाण्याच्या समोरच हा प्रकार खुलेआम सुरु आहे़ मात्र याबाबत बहुधा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसावी़ त्यात आता मटका बंद होण्याच्या मागणीसाठी या भागातील महिलांनी पुढाकार घेतला आहे़ त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे़ तसेच मटका बुकी आणि शिवाजीनगर पोलिसांचे हितसंबंध असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे़ (प्रतिनिधी)