युतीशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्यच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:57 IST2018-06-29T00:35:56+5:302018-06-29T05:57:48+5:30
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

युतीशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्यच...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.
रिपाइंच्या मराठवाडास्तरीय बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युतीच्या सत्ता सूत्रानुसार ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल. यासाठी शिवसेनेने बीजेपी सोबत राहिले पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपसोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार आहे. केंद्रात कॅबिनेट आणि महाराष्ट्रातही एखादे मंत्रीपद देऊन सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, असाही आपला प्रयत्न राहणार आहे. शिवसेना जर भाजपसोबत राहिली नाही, तर त्यामध्ये सेनेचेच नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला किमान २ जागा मिळाव्यात, विधानसभेत सेना-भाजपची युती झाली, तर रिपाइंला१४-१५ जागा, युती झाली नाही तर किमान २५-३० जागा दिल्या पाहिजे. अॅट्रॉसिटी अॅक्टसंदर्भात आॅर्डिनन्स काढण्यासाठी आमचे केंद्रीय समाजकल्याण मंत्रालय विचार करीत आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये १८ जुलै ते १० आॅगस्ट या काळात अॅट्रॉसिटी अॅक्टला संरक्षण देणारा आॅर्डिनन्स जारी करण्याचा विचार आहे. मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये मिळणाºया आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी कायदा करावा, अशी एससी, एसटी अधिकारी फोरमची मागणी आहे. नाणारच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, विकास हवा असेल, तर नाणार प्रकल्प झालाच पाहिजे; पण विस्थापितांचे नुकसान होता कामा नये. तेथील विस्थापित लोकांच्या पुनर्वसनासाठी बजेटमध्ये तरतूद व्हावी.
रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपद
महाराष्ट्राच्या सत्तेत रिपाइंला वाटा मिळाला पाहिजे. महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा. तसेच आरपीआयला एक एमएलसी व एक मंत्रीपद मिळावे. राहिलेल्या एक- दीड वर्षासाठी का होईना आरपीआयला संधी मिळाली पाहिजे, यासाठी एक- दोन दिवसांतच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे आठवले म्हणाले.