हिवाळा आरोग्यासाठी सर्वोत्तम; पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाल?

By संतोष हिरेमठ | Published: November 29, 2023 01:22 PM2023-11-29T13:22:57+5:302023-11-29T13:23:42+5:30

आहाराकडेही लक्ष द्या : वजन वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते.

Winter is best for health; But what vegetables to eat to lose weight? | हिवाळा आरोग्यासाठी सर्वोत्तम; पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाल?

हिवाळा आरोग्यासाठी सर्वोत्तम; पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाल?

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा आरोग्यासाठी सर्वोत्तम ऋतू म्हटला जातो. याच ऋतूत अनेकजण वजन वाढण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. चोथायुक्त आणि भरपूर जीवनसत्वे असलेल्या भाज्या वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे आहारात त्यांचा समावेश केला पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे जास्त भूक लागते. त्यातून वजन वाढीला हातभार लागतो. त्याच वेळी अनेकजण वजन कमी करण्यासाठी धडपड करतात. व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. वजन वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते. प्रथिने, फायबरने समृद्ध असलेल्या भाज्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

हिवाळ्यात खा या भाज्या
गाजर : गाजरामध्ये भरपूर फायबर (चोथा) असते. गाजर खाल्ल्याने पचनशक्तीही मजबूत होते.
बीट : बीटमध्ये लोह आणि इतर अनेक जीवनसत्वे असतात. शरीरात रक्तवाढीसाठीही ते फायदेशीर ठरते.
मुळा : मुळ्यामध्ये असलेले पोषक तत्त्वे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. भाजी, कोशिंबीर म्हणून आहारात घेऊ शकतो.
पालक : पालकामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते.

हिरव्या भाज्या खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवावे
हिरव्या भाज्या खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. पाण्यामध्ये उकळून खाता कामा नये. पाण्यात उकळल्यामुळे त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात.

जीवनसत्व मिळण्यास मदत
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी काकडी, गाजर, बीट, मुळा आदी चोथायुक्त फळभाज्या खाण्यास प्राधान्य द्यावे. ती कच्च्या स्वरूपात खाल्याने चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे मिळतात. भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे.
- रश्मी जोशी, आहारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.

Web Title: Winter is best for health; But what vegetables to eat to lose weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.