व्यसनी पतीच्या जाचास कंटाळून पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:39 IST2019-05-16T19:37:32+5:302019-05-16T19:39:15+5:30
पती दारू पिऊन पत्नीस नेहमी मारहाण करत असे

व्यसनी पतीच्या जाचास कंटाळून पत्नीची आत्महत्या
दावरवाड़ी (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका विवाहितेने पतीच्या त्रासास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१५) रात्री घडली. संगीता रामेश्वर चोरमले (३२) असे मृत विवाहितेचे नाव असून आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे.
रामेश्वर चोरमले व संगीता यांना तीन लहान मुले आहेत. संगीताची सासु ह्या देवदर्शनासाठी बाहेर गावी गेल्या आहेत. रामेश्वर यांना दारूचे व्यसन असल्याने संगीता आणि त्यांच्यात नेहमी वाद होत असत. यातून रामेश्वर हा पत्नी संगीतास त्रास देत असे. या त्रासास कंटाळून संगीता यांनी बुधवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिस पाटील दिनकर एड़के यांनी पाचोड़ पोलिसांना दिली. यावरून सपोनि अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जे. एल. उबाळे, एच. एन. धनवे, जबीर एच शेख, व्हि.ए. काकड़े आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शव विच्छेदनानंतर संगीता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी रामेश्वर यांना अटक करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी रामेश्वर याला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.