शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद कशासाठी हवी ? इतर पर्यायांचा व्हावा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:32 IST

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना ठेवावे जातीपासून दूर, तज्ज्ञांचा सूर

- योगेश पायघन

औरंगाबाद : शाळेच्या दाखल्यावर, पटावर जातीचा उल्लेख लहानग्यांच्या मनात जातीची भावना पेरण्यास मदत करते. जातीची नोंद ठेवायचीच असेल, तर त्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत. शाळेच्या दाखल्यावरील जात हटवली जावी. केवळ कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातून जात हटावी, असा सूर सर्वच स्तरांतून निघत आहे.

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळेच्या टीसीवर जात असली तरी जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. त्यासाठी निर्गम उतारा लागतोच. मग, शाळेच्या दाखल्यावर जात नसली, तरी काही अडचण येणार नाही. सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने प्रवर्ग बनवले गेले. प्रवर्गावर घटनात्मक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक न्यायाची जी प्रक्रिया सुरू आहे, ती अधिक न्यायसंगत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पुढे चालवली गेली पाहिजे. 

मुलांवर शाळेत जातपात बिंबवू नयेशाळेच्या दाखल्यावरून जात हटवायला पाहिजे. प्रवेश निर्गम उताऱ्यावर नोंद ठेवता येईल किंवा जातीच्या प्रमाणपत्रासाठी विशेष अभियान घ्यावे. केवळ शाळेच्या दाखल्यावर जात असली तरी जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेत जात कळल्याने जातीची, प्रवर्गाची ओळख लहान मुलांवर शालेय जीवनात बिंबत जाते.-एस.पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

दृष्टिकोन बदलल्याचे जाणवतेजातीचा उल्लेख शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेच्या नेहमीच्या कामात येण्यामुळे मुलांमध्ये जातीसंबंधीच्या भाव भावना निर्माण होतात. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे अनेकदा जाणवते. त्यासाठी निर्गम उताऱ्यावर नोंदी, स्वतंत्र प्रमाणपत्र, असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे टीसीवरचा जातीचा उल्लेख हटवायला हवा.-शकिला न्हावकर, प्रभारी मुख्याध्यापक

भेदभाव अनुभवायला येतातशाळेचा दाखला जात कळण्याचे मुख्य माध्यम ठरते. जात कळाल्यावर जातीय मानसिकतेचे लोक त्याच भावनेने वागायला लागतात. सर्वच तसेच नसतात. मात्र, आपला व परका, हे भेद अनुभवायला येतात. हे बदल जात कळाल्यावर, वागणे बदल्यावर जाणवते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या कागदपत्रांतून दिसणारी जात हटवली जावी.-योगेश बहादुरे, संशोधक विद्यार्थी

...तर वास्तविक जीवनातूनही जात हटावीजात सर्वच ठिकाणांहून हटली पाहिजे. भारतातून कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातील जात हटण्याची नितांत गरज आहे. देशात वर्ण जातीव्यवस्थेचा तुरुंग आहे. हा तुरुंग उद्‌ध्वस्त झाला पाहिजे. आधुनिक भारताची भूमिका तशीच असली पाहिजे. त्यासाठी कागदोपत्री जातीपातीच्या नोंदी नष्ट केल्या पाहिजेत. वास्तवात राज्य यंत्रणेने त्यासाठी अग्रक्रमाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगारविषयक धोरणे निर्माण करून प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचवावी.-ॲड. विष्णू ढोबळे, अध्यक्ष, समाजवादी जनपरिषद, महाराष्ट्र

जातीव्यवस्थेचे विसर्जन व्हावेशाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असू नये. खरे पाहिले तर जातीव्यवस्थेचे विसर्जन झाले पाहिजे. जातीभेदाच्या विषाचा परिणाम कमी करायचा असेल, तर शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातूनच ते होऊ शकेल. दाखल्यावर व पटावर जातीचा उल्लेख टाळून त्याची सुरुवात होऊ शकते. सध्याच्या व्यवस्थेत जिथे अनिवार्य आहे तिथे जात प्रमाणपत्र वापरता येईल. दाखल्यावर जात येणे अनावश्यक आहे.-डाॅ. श्रीरंग देशपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी