शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

सेनेच्या वाघाने आपल्या गडात एकटे लढवून दाखवावे, मित्रपक्ष कशाला हवेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:29 PM

MP Imtiaz Jalil on Shivsena पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू.

ठळक मुद्देमुस्लिमांशिवाय कोणतीही आघाडी देशात शक्य नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा लढविणार

औरंगाबाद : शिवसेनेने आपल्या गडामध्ये मनपा निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी. राज्याच्या आघाडीतील मित्रपक्षांची गरज कशाला पडतेय, अशाप्रकारे एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत शिवसेनेला डिवचले. धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांच्याकडून होत नसेल तर मी मंदिर उघडून देतो, असा चिमटाही त्यांनी काढला. (  MP Imtiaz Jalil challenges Shivsena )  

महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. २०१५ च्या तुलनेत आणखी मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील, असा दावा खा. जलील यांनी केला. पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू. सध्या शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जालना रोडचे काम सुरू आहे. विमानतळासमोर ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे. त्याला एमआयएमचा विरोध आहे. आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात याची गरज आहे. स्थानिक सर्व आमदारांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे. प्राधिकरणाने जागा न बदलल्यास थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आम्ही जाऊन बसणार आहोत. मुकुंदवाडी स्मशानभूमी ते थेट केंब्रिजपर्यंत स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही पत्रकार परिषदेत खा. जलील यांनी केली. जालना रोडवरील वक्फ मालमत्ता खरेदी करणारे, विक्री करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. वक्फ बोर्डाचे कर्मचारी चोर नव्हे तर डाकू आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजेद, शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश, दिल्लीत लढूशरद पवार यांच्या नवीन राष्ट्रीय आघाडीबद्दल पत्रकारांनी जलील यांना छेडले असता मुस्लिमांशिवाय कोणतीही आघाडी देशात शक्य नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा लढविणार असल्याचेही खा. जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना