कोण होणार खंडाळा गावचा कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:58+5:302021-01-13T04:10:58+5:30

ग्रामस्थांमध्ये उत्सुकता खंडाळा : वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. विद्यमान सरपंचदेखील निवडणूक ...

Who will be the caretaker of Khandala village? | कोण होणार खंडाळा गावचा कारभारी

कोण होणार खंडाळा गावचा कारभारी

ग्रामस्थांमध्ये उत्सुकता

खंडाळा : वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. विद्यमान सरपंचदेखील निवडणूक रिंगणात उतरले असून, तरुण उमेदवारदेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण निघणार असल्याने गावाचा कारभारी नेमका कोण होणार हे येत्या काळातच कळेल. आजी-माजी सरपंचांचा या आरक्षणाला विरोध आहे. आठ डिसेंबर रोजी निघालेले आरक्षण सर्वसामान्यांना मान्य होते; परंतु शासनाने निवडणुकांनंतर आरक्षण जाहीर होईल, असे घोषित केल्यामुळे बऱ्याच पक्षांच्या पुढाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोशल मीडियाद्वारे चांगलीच प्रचाराची तालीम दिसत आहे. सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक असल्याने गाव पुढारी मात्र केव्हा निवडणूक होईल आणि केव्हा गावाची सत्ता आपल्या हातात येईल, या आशेने कामाला लागले आहेत. सतरा सदस्य संख्या असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतीतील निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झालेला आहे.

Web Title: Who will be the caretaker of Khandala village?