छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष कोण? महायुतीचे अद्याप काही ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:23 IST2026-03-17T16:23:30+5:302026-03-17T16:23:52+5:30

वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय होईल, असे भाजप व शिंदसेनेच्या नेत्यांनी नमूद केले.

Who is the president of Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad? The Mahayuti has not yet decided anything | छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष कोण? महायुतीचे अद्याप काही ठरेना

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष कोण? महायुतीचे अद्याप काही ठरेना

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १० मार्चला पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या हातमिळवणीच्या राजकारणानंतर आता बुधवारी (दि. १८) होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संख्याबळात महायुतीचे पारडे जड असले तरी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय होईल, असे भाजप व शिंदसेनेच्या नेत्यांनी नमूद केले.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची २०१७ सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता पं. स. निवडणुकीनंतर बळावली आहे. २०१७ ते २०२२ या काळात जास्त संख्याबळ असतानादेखील भाजपला पाच वर्षे अध्यक्ष पदापासून दूर राहावे लागले होते. त्यावेळी शिवसेनेने (अखंडित) काँग्रेसशी हातमिळवणी करीत पाचही वर्षे अध्यक्षपद स्वत:कडे राखले हाेते. तसा प्रकार यावेळी होऊ नये, यासाठी शिंदेसेना व भाजपमध्ये वाटाघाटी योग्यरीत्या होणे आवश्यक आहे. पहिले अडीच वर्षे भाजपकडे अध्यक्षपद राहावे, यासाठी भाजप आग्रही आहे. तर शिंदेसेनेने अद्याप पत्ते ओपन केलेले नाहीत. पंचायत समिती सभापती निवडणुकीनंतर शिंदेसेना भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच उद्धवसेनेची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करू...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. शिंदे यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ.
-खा. संदीपान भुमरे, शिंदेसेना नेते

महायुतीचा अध्यक्ष होईल..
महायुतीचा अध्यक्ष होईल. अद्याप याविषयावर चर्चा झालेली नाही. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते जो आदेश देतील, त्याचे पालन केले जाईल.
-अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री

जि. प.मधील संख्याबळ असे....
भाजप : २३
शिंदेसेना : २१

काँग्रेस : १ (नुकताच भाजपमध्ये प्रवेश)
राष्ट्रवादी (अजित पवार) : ४
राष्ट्रवादी (शरद पवार) : १
उद्धवसेना : ९
अपक्ष : ४
एकूण : ६३

जि. प. निवडणुकीत उद्धवसेना संधी साधणार?
जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेना व भाजपमध्ये फाटले तर आम्ही प्रयत्न करू अन्यथा उद्धवसेना तटस्थ राहील, असे अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पं. स. सभापती निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांत मतभेद झाले. जि.प. निवडणुकीत अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी भाजप नेते अतुल सावे व शिंदेसेना नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
जिल्हा परिषद अध्यक्षपद दोन्ही पक्षांनी प्रत्येकी अडीच-अडीच वर्ष वाटून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिला आहे. पहिला अध्यक्ष आपलाच व्हावा, यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. यात बिनसले तर एकाला पाठिंबा देऊन काही पदे मिळवण्याची उद्धवसेनेची तयारी सुरू आहे.

जि. प. अध्यक्ष निवडणुकीची रंगीत तालीम
अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात होईल. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे पीठासीन अधिकारी राहतील. सोमवारी मतदान प्रक्रियेची रंगीत तालीम प्रशासनाने झाली.

Web Title : छत्रपति संभाजीनगर जिला परिषद अध्यक्ष: महायुति में अनिश्चितता, नेतृत्व अधर में।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर जिला परिषद अध्यक्ष चुनाव अनिश्चित, क्योंकि महायुति भागीदार बातचीत कर रहे हैं। भाजपा पहला कार्यकाल चाहती है, जबकि शिंदे की सेना प्रतिबद्ध नहीं है। गुटों से उद्धव सेना को अवसर मिल सकता है।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad President: Mahayuti alliance undecided, leadership in limbo.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad president election uncertain as Mahayuti partners negotiate. BJP seeks first term, while Shinde's Sena remains non-committal. Factions could give Uddhav Sena an opportunity.