शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

महिला सदस्य प्रश्न मांडत असतानाच राष्ट्रगीत सुरू

By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST

औरंगाबाद : आमच्या मतदारसंघाच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही, असे ठणकावत महिला सदस्य पुढे सरसावल्या खऱ्या; परंतु अचानक राष्ट्रगीताला सुरुवात झाली.

औरंगाबाद : आमच्या मतदारसंघाच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही, असे ठणकावत महिला सदस्य पुढे सरसावल्या खऱ्या; परंतु अचानक राष्ट्रगीताला सुरुवात झाली. त्यामुळे महिला चक्रावल्या. मात्र, त्यांनी आपले म्हणणे ठासून सांगणे सुरूच ठेवल्यामुळे शेवटी राष्ट्रगीतच अर्ध्यावर थांबविण्याचा प्रकार सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घडला. ३२ गटांतून विजयी झालेल्या महिला व जिल्ह्यातील सात पंचायत समितींच्या सभापती ७ महिला, अशा ३९ महिला सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात आहेत, तर पुरुष सदस्यांची २८ संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात होताच, आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ द्या म्हणून महिला सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. अगदी सुरुवातीपासूनच प्रत्येक महिला व पुरुष सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाची री ओढणाऱ्या पुष्पा जाधव या दुष्काळी परिस्थितीत गाळ काढण्यासाठी महिला सदस्यांसाठी निधीची मागणी करत होत्या. सीईओ दीपक चौधरी यांनी त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देऊ, असे घोषितही केले. मात्र, त्यात आणखी ५० लाख रुपये वाढवावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. तोच अचानक राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे सर्वच महिला सदस्यांनी ओरड सुरू केली. त्यामुळे राष्ट्रगीत अर्ध्यावरच थांबवावे लागले. राष्ट्रगीत थांबल्यानंतर सर्वच महिलांनी आम्हाला वेळ मिळत नाही, असा आरोप केला. महिला सदस्यांच्या गटात ड्युयल डेस्क, ग्रीन बोर्ड, गाळ काढण्याची योजना आदी काहीच मिळाले नाही. शिवाय सभागृहात वेळही मिळत नाही, अशी ओरड त्यांनी सुरूच ठेवली होती. तोच पुन्हा राष्ट्रगीत सुरू झाले व अध्यक्षांनी सर्वसाधारण सभा संपल्याची घोषणा केली. सभेनंतर सुरेखा जाधव, नंदा काळे, सिंधू पिवळ, अनिता राठोड, संगीता मोटे आदींनी अध्यक्ष शारदा जारवाल यांची भेट घेऊन महिला सदस्यांना बोलण्यासाठी वेळ राखीव ठेवावा, अशी मागणी केली. महिला सदस्यांना बोलण्यास वेळ मिळायलाच हवा, अशी भूमिका अध्यक्ष शारदा जारवाल यांनी मांडली. गाळ आणि राष्ट्रगीतगेल्या वर्षी दुष्काळी कामे करताना गाळ काढण्यासाठी आलेला सर्व निधी फक्त १७ सदस्यांच्या गटात वापरला गेला. त्यामुळे या मुद्यावर चर्चा होऊच नये, अशी व्यूहरचना काही सदस्यांनी करून ठेवली होती. महिला सदस्य गाळाचा विषय उपस्थित करत होत्या, तर काही सदस्य नवनवीन चर्चेचे मुद्दे काढून महिलांचे मुद्दे भरकटून टाकत होते. सुरुवातीपासून नंदा काळे यांनी हा विषय लावून धरला होता. सभेच्या उत्तरार्धात तो चर्चेला येणार अशी चिन्हे दिसताच, राष्ट्रगीत वाजविण्याचा इशारा झाल्याची चर्चा सभा संपल्यानंतर सुरू झाली होती.