शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

कोणता झेंडा घेऊ हाती ! राज्यात ‘अनाकलनीय’ राजकारण; सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 15:15 IST

१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे.

- स.सो. खंडाळकरऔरंगाबाद : राज्यातील सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय असल्याची भावना वाढत असून, आगामी निवडणुकांपर्यंत युती व आघाड्यांची स्थिती नेमकी अशी असेल, याबाबत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ( Which flag to take! ‘Incomprehensible’ politics in the state; Activists of all parties in confusion ! ) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांनी १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर राज्य पातळीवर सुरू झालेल्या राजकीय घुसळणीनंतर ही संभ्रमावस्था आणखी वाढली. शिवसेना - भाजप ( Shiv Sena - BJP ) एकत्र येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली. चिमटे काढणे, उपहास करणे आणि टोले लगावणे हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे व त्याला अनुसरूनच ते बोलले असावेत, असे काही जणांना वाटते. औरंगाबादेत वर्षानुवर्षे महापालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता राहिली. शिवाय, मनपाची निवडणूक होऊ घातलेली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असतात आणि ती डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणिते मांडत असतात. शहरात एमआयएमचा ( AIMIM ) एक मोठा दबाव गट निर्माण झाल्याने राजकारणाचा रंग बदलतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी युतीच्या संकेताची गुगली टाकून पाहिली असावी, असे काही कार्यकर्त्यांना वाटत आहे.

१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनातही काहीतरी आहे, असे वाटू लागले आहे. सरकार पाडायचं आहे; पण त्याचं पाप आमच्या पदरात नको, अशी सावध भूमिका भाजपची दिसून येते. सध्याच्या राजकारणात कोण कुणावर दबाव वाढवतोय, मुख्यमंत्री कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव वाढवू इच्छित आहेत, की भाजप-राष्ट्रवादीवर, आगामी सरकार शिवसेना - भाजपचे की राष्ट्रवादी कॉंग्रेस- भाजपचे, अशा खमंग चर्चांचे पेव फुटले आहेत. ईडी, सीबीआयचा भुंगा कधी कोणत्या नेत्याच्या मागे लागेल, याचा नेम राहिला नाही. या पार्श्वभूमीवर कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस