छत्रपती संभाजीनगर : गेले वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपले. राजकीय पक्ष प्रचारात, तर प्रशासन आचारसंहिता अंमलबजावणीत गुंतलेले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष झाले. कापूस, सोयाबीनला कमी भावाच्या भोवती विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरला; परंतु शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाय शोधण्याबाबत कुठल्याही पक्षाने जाहीर प्रचारातून एक शब्दही काढला नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मराठवाड्यात ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. ९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. उर्वरित ३०३ प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना ३ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मदतीचे वाटपही झाल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दिवसाकाठी ३ आत्महत्यागेल्या वर्षात दिवसाकाठी २ ते ३ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. कापूस, सोयाबीनला भाव नसणे, दुधाचे दर मागे-पुढे होणे, शेतीमध्ये शाश्वतता नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला. मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, अशा चक्रात शेतकरी आहे. या व इतर अनेक कारणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामहिना..................आत्महत्याजानेवारी ६९फेब्रुवारी ७०मार्च ६७एप्रिल ५८मे ६२जून ९४जुलै ७७ऑगस्ट १००सप्टेंबर ८३ऑक्टोबर ७२नोव्हेंबर ७२डिसेंबर १०९एकूण ९४८